प्रतिनिधी /वास्को
वास्को, मुरगांव व दाबोळी भाजपा युवा मोर्चा, महिला मोर्चा व भाजपा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी जागतिक वारसा दिनानिमित्त मुरगांव किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविली.
याप्रसंगी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, वास्को भाजप मंडळाचे अध्यक्ष दीपक नाईक, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य व रवींद्र भवनचे अध्यक्ष जयंत जाधव, मुरगांव भाजप मंडळाचे अध्यक्ष संजय सातार्डेकर, मुरगांवचे नगराध्यक्ष दामोदर कासकर, उपनगराध्यक्ष अमेय चोपडेकर, नगरसेविका मंजूषा पिळर्णकर, कुणाली मांद्रेकर, नगरसेवक प्रजय मयेकर, नगरसेवक गिरीष बोरकर, भाजपचे सरचिटणीस गौरीश नाईक, संदीप मालवणकर, दाबोळी युवा मोर्चाचे अध्यक्ष व बोगमाळो पंचायतीचे उपसरपंच संकल्प महाले, मुरगांव युवा अध्यक्ष योगेश बांदेकर महाले, दामोदर लोटलीकर, रिमा सोनुर्लेकर, किरण नाईक, दर्शिल वालावलकर, रक्षा साळगांवकर, अश्विनी पेडणेकर, जुई शेर्लेकर, लक्ष्मी चव्हाण व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.