गुरुवारी बहुतेक उमेदवार अर्ज भरणार : 33 पंचायतीसाठी 3 निर्वाचन अधिकारी नियुक्त
प्रतिनिधी /म्हापसा
बार्देश तालुक्यातून पंचायत निवडणुकीसाठी 33 पंचायतीमधील मंगळवारी 15 जणांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. पहिल्या दिवशी आसगाव पंचायतीतून एकमेव अर्ज आला होता. आज दुसऱया दिवशी 15 जणांनी अर्ज सादर केल्याने दुसरा दिवस अखेरीस एकूण 16 जणांचे अर्ज दाखल झाले आहे. 25 जुलै ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून बहुतेक उमेदवारांनी गुरुवार हा अर्ज भरण्याचा दिवस ठरविला असून त्या दिवशी बार्देशमधून अंदाजे 100 पेक्षा वर संख्या जाण्याची शक्यता असून बार्देश निर्वाचन अधिकाऱयांनी ती तयारी ठेवली आहे.
3 निर्वाचन अधिकाऱयांची निवड
बार्देश तालुक्यात 33 पंचायतींसाठी 3 मामलेदारांची निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी राहुल देसाई यांच्याकडे नेरूल, कांदोळी, पेन-द- फ्रान्स, साळगाव, पिळर्ण-मार्रा, साल्वादोर-द-मुंद, सांगोल्डा व कळंगूट या आठ पंचायती आहेत. निवडणूक अधिकारी कृष्णा गावस यांच्याकडे हणजूण-कायसूव, हडफडे-नागवा, आसगाव, कामुर्ली, ओशेल-शिवोली, पोंबुर्फा-वळावली, पर्रा, रेईस-मागूस, मार्ना-शिवोली, सडये-शिवोली, सुकूर, थिवी व वेर्ला-काणका या 13 पंचायती तर अनिल राणे सरदेसाई यांच्याकडे अस्नोडा, कोलवाळ, गिरी, नादोडा, मयडे, शिरसई, रेवोडा, हळदोणा, पीर्ण, उसकई-पालये-पुनोळा, नास्नोळा व बस्तोडा या 12 पंचायतींची जबाबदारी आहे.
वेर्ला-काणकातील कामे ग्रामस्थांच्या डोळय़ांना पाणी पुसणारी- ऐश्वर्या साळगावकर (0719map12)
वेर्ला-काणका पंचायतीमधून आपण सोनारवाडा लोपीसवाडा व फोंडाकवाडा या तीन वॉर्डासाठी आपण अर्ज दाखल केला असल्याची माहिती ऐश्वर्या साळगावकर यांनी आपला अर्ज दाखल केल्यावर पत्रकारांशी बोलताना सांगितले. या वॉर्डात गेल्या 15 वर्षात काहीच कामे झाली नाही. गटार खुले आहे, पाणी समस्या, वीज समस्या अद्याप तशीच पडून आहेत. येथे कामे केली की डोळय़ाला पाणी पुसण्यासारखी आहे. असे साळगावकर म्हणाल्या.
वेर्ला काणका पंचायत : वॉर्ड क्रमांक 5- ऐश्वर्या अर्जुन साळगावकर
सुकूर पंचायतः वॉर्ड क्रमांक 3- संतोष सहदेव मोरजकर, वॉर्ड क्रमांक 9- साची संदीप मांजरेकर. शिवोली-सडयेः वॉर्ड क्रमांक 6- ओंकार राघोबा हरमलकर. शिवोली मार्ना पंचायत ः वॉर्ड क्रमांक 1- सिद्धेश गुरुदास दाभोळकर. पोंबुर्फा वळावली पंचायतः वॉर्ड क्रमांक 3- पांडुरंग घारसू साळगावकर. हडफडे-नागवा पंचायतः वॉर्ड क्रमांक 1- सनया सखाराम नाईक, वॉर्ड क्रमांक 2- सखाराम पुंडलिक नाईक, वॉर्ड क्रमांक 3- रोशन वासुदेव रेडकर, वॉर्ड क्रमांक 4- आगोस्तिनो डायगो डिसोझा, वॉर्ड क्रमांक 4- विओलंता आगोस्तीन डिसोझा, वॉर्ड क्रमांक 7- अनिकेत ज्ञानेश्वर शिरोडकर. पेन द-फ्रान्स पंचायत- वॉर्ड क्रमांक 8- राज सुरेश नाईक. साळगाव पंचायतः वॉर्ड क्रमांक 3- एकनाथ वसंत ओरसकर. अस्नोडा पंचायतः वॉर्ड क्रमांक 8- विजय बाबय बाणावलीकर.
लोकांचे मत विकत घेऊ नका- बाळा नाईक
आपण गेली 30 वर्षापासून अधिक काळ पंचसदस्य म्हणून वेर्ला-काणका पंचायतीमध्ये पंच म्हणून काम पाहत आहे. लोकांना दिलेली भरीव विकासकामे व प्रेम याच्यामुळे आपण आजवर पंचायतीमध्ये निवडून येत आहे. यावेळी आपला वॉर्ड महिलांसाठी राखीव आहे. आज पैशांचा खेळ चालला आहे. सर्वांच्या संपर्कात राहून गावात काम केल्यास पैसे वाटण्याची गरज नाही. आमिषे दाखवून पैसे देतात व नंतर त्यांनाच लुबाडतात असा आरोप वेर्ला काणका पंचायतीचे वयोवृद्ध पंच बाळा दिनकर नाईक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ‘तरुण भारत’ला सांगितले. लोकांचे मत तुम्ही विकत घेऊ नका असे ते म्हणाले.