चित्रपटाच्या चित्रिकरणाला प्रारंभ
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा दीर्घकाळापासून मोठय़ा पडद्यावर परतण्यासाठी प्रतीक्षा करत आहे. यापूर्वी ती ‘भूज ःद प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात दिसून आली होती. अलिकडेच अभिनेत्रीच्या आगामी चित्रपटाची घोषणा झाली आहे. सोनाक्षीने आता या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू केले आहे. सोनात्रीने स्वतःचा चित्रपट ‘निकिता रॉय अँड द बुक ऑफ डार्कनेस’चे लंडनमध्ये चित्रिकरण सुरू केले आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन सोनाक्षीचा बंधू कुश सिन्हा करत आहे. कुश या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात स्वतःचे पहिले पाऊल ठेवणार आहे. इन्स्टाग्रामवर कुशने ‘निकिता रॉय’चे पोस्टर शेअर केले आहे. यात सोनाक्षीचा चित्रपटातील लुक दिसून येत आहे.
सोनाक्षीसोबत या चित्रपटात परेश रावल आणि सुहैल नय्यर देखील दिसून येतील. या चित्रपटाची निर्मिती एनव्हीबी फिल्म्सकडून करण्यात येत आहे. सोनाक्षी सिन्हा मोठय़ा पडद्यावर दीर्घकाळानंतर पुनरागमन करत असल्याने ती अत्यंत उत्सुक आहे. 2019 मध्ये ती ‘दबंग 3’मध्ये सलमान खानसोबत दिसून आली होती. तर त्यानंतर तिचा एक चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता.