Tarun Bharat

दीड कोटीचे ‘बार्बी हाउस’

Advertisements

स्वीमिंग पूलपासून किचन देखील गुलाबी रंगाचे

बार्बी डॉलचा छंद सर्वसाधारणपणे प्रत्येक मुलीला असतो. एका वयापर्यंत सवं मुली बार्बीप्रमाणेच जीवन जगण्याचे स्वप्न पाहतात. परंतु वय वाढू लागताच त्यांचे छंद आणि प्राथमिकता बदलू लागते. ब्राझीलमधील ब्रुना बार्बीचे बार्बीसाठीचे वेड तारुण्यातही कमी झाले नाही. तिने स्वतःच्या जगाला बार्बीच्या पसंतीच्या गुलाबी रंगात रंगवून टाकले आहे.

लहानपणापासूनच बार्बी डॉल्सबद्दल प्रेम असणाऱया ब्रूना बार्बीने स्वतःचे कपडे, ऍसेसरीज आणि चष्म्यासह घर आणि स्वीमिंग पूल देखील गुलाबी रंगात रंगवून टाकला आहे. ती स्वतःच्या पिंक पॅराडाइजमध्ये राहत आहे.

ब्राझीलच्या परानामध्ये ब्रूना राहते. पूर्वी ती वकिली करायची आणि तिचे खरे नाव ब्रूना कॅरोलिना पेरेस आहे. तिला शाळेपासूनच लोक बार्बी म्हणायचे आणि हे नाव तिच्यासोबत कायमचेच जोडले गेले. आता ती याच नावाने प्रसिद्ध झाली आहे. तिच्या टिकटॉक आणि इन्स्टाग्रामवर देखील बार्बी लाइफस्टाइलची छायाचित्रे आणि व्हिडिओ आहेत. सोशल मीडियाद्वारे ती स्वतःच्या अजब राहणीमानावरून प्रसिद्धी मिळवत आहे. केवळ टिकटॉकवरच ब्रूना बार्बीचे 18.9 दशलक्ष फॉलोअर्स ओत. तर ब्राझीलच्या 10 सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱया लोकांमध्ये ती ामील आहे.

स्वतःच्या हाउस टूरचे व्हिडिओ ती नियमित अपलोड करत असते आणि त्यांना लोकांची मोठी पसंती मिळते. लाखोंच्या संख्येत लोक तिच्या ब्राइट पिंक घराचा कानाकोपरा पाहण्यास उत्सुक असतात. तसेही ब्रूनाने बार्बी ड्रीमहाउस तयार करण्यासाठी मोठी मेहनत केली असून पैसा पाण्यासारखा खर्च केला आहे.

ब्रूनाने स्वतःच्या अनोख्या मिशनला पूर्ण करण्यासाठी तिने सुमारे 1 कोटी 54 लाख रुपयांहून अधिक रक्कम खर्च केली आहे. तिच्या घरातील स्वीमिंग पूल देखील गुलाबी रंगाचे आहे. बेडरूम, बाथरूम, किचन आणि वॉर्डरोब देखील गुलाबीच आहे. तसेच तिच्याकडील वाहन देखील गुलाबी रंगाचे आहे. तिने स्वतःच्या घरातील भांडी तसेच फर्निचर देखील गुलाबी रंगातच तयार करवून घेतले आहे.

Related Stories

जादुई आहेत 11 वर्षीय मुलीचे केस

Amit Kulkarni

विवाह नव्हे घटस्फोटाचा आनंदोत्सव

Patil_p

मंडई म्हसोबा ट्रस्टतर्फे आजपासून विधायक व धार्मिक म्हसोबा उत्सव

Rohan_P

2 किलोंचे सोन्याचे दागिने घालतो टिकटॉक स्टार

Patil_p

अडॉल्फ हिटलरच्या घडय़ाळाचा लिलाव

Patil_p

2 ड्रिंक्स एकाचवेळी पिण्यासाठी अनोखी शक्कल

Patil_p
error: Content is protected !!