Tarun Bharat

इम्रान खान यांच्यावर दीड तास शस्त्रक्रिया

पायात छर्रे सापडल्याची माहिती ः हाडालाही दुखापत

इस्लामाबाद / वृत्तसंस्था

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची प्रकृती आता स्थिर आहे. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या इम्रान यांच्यावर दीड तास लागून शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या पायात गोळीचे काही तुकडे अडकले होते, ते काढण्यात आले आहेत. गोळी लागल्याने त्यांच्या उजव्या पायाचे हाड तुटल्याचेही शौकत खानम हॉस्पिटलचे डॉक्टर फैजल सुलतान यांनी सांगितले.

इम्रान खान यांच्या लाँगमार्चमध्ये झालेल्या हल्ल्याविरोधात देशभरात निदर्शने होत आहेत. गुरुवारी रात्री उशिरा पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफच्या (पीटीआय) कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत उग्र आंदोलन केले. संतप्त कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी जाळपोळ आणि घोषणाबाजी केली. ‘पीटीआय’ने पाकिस्तान बंदची घोषणा केल्यामुळे बऱयाच भागात शुकशुकाटही दिसून येत होता. बंददरम्यान अनुचित घटना टाळण्यासाठी कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती.

एकाचा मृत्यू, 13 जखमी

गुजरानवाला येथे गुरुवारी लाँगमार्चदरम्यान इम्रान खान यांच्यावर झालेल्या हल्ल्यात खासदार फैसल जावेद यांच्यासह एकूण 13 जण जखमी झाले होते. जखमींपैकी एकाचा मृत्यू झाला. इम्रान खान यांची प्रकृती स्थिर असून अजूनही ते वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहेत.

Related Stories

चीनमध्ये अडकलेले भारतीय मायदेशी दाखल

Patil_p

पाक संसदेचे नियंत्रण तिसऱ्या शक्तीच्या हातात

Patil_p

फेकण्याऐवजी खाता येणारी पाण्याची बाटली

Patil_p

मालदीवचे माजी अध्यक्ष बॉम्बहल्ल्यात जखमी

Patil_p

ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांनी गाठला 35 लाखांचा टप्पा

datta jadhav

युक्रेन-रशिया चर्चा पुन्हा सुरु

Patil_p