Tarun Bharat

हालगीमर्डी येथे दीड किलो गांजा जप्त

वृद्धाला अटक : हिरेबागेवाडी पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी /बेळगाव

हालगीमर्डी येथे गांजा विकणाऱया एका वृद्धाला अटक करण्यात आली आहे. हिरेबागेवाडी पोलिसांनी बुधवारी ही कारवाई केली असून त्याच्याजवळून 1 किलो 558 ग्रॅम ओला व सुका गांजा जप्त करण्यात आला आहे.

बसणगौडा रुद्रगौडा पाटील (वय 66, रा. हालगीमर्डी, ता. बेळगाव) असे अटक करण्यात आलेल्या वृद्धाचे नाव आहे. हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार सिन्नूर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. या वृद्धावर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

बसणगौडा यांनी आपल्या शेतात मिरची पिकात गांजा पिकविला होता. 1 किलो 230 ग्रॅम ओला व 328 ग्रॅम सुका गांजा त्याच्याजवळून जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे 18 हजार रुपये इतकी होते. हिरेबागेवाडी पोलीस पुढील तपास करीत आहेत. 

Related Stories

गुंजी माऊली देवीचा पालखी सोहळा नियमांचे पालन करुन झाला साजरा

Patil_p

स्मार्ट सिटीअंतर्गतच्या पहिल्या रस्त्याची अवस्था दयनीय

Patil_p

जमखंडी येथे 33 टन तांदूळ जप्त

Amit Kulkarni

सुळगे-येळ्ळूर ऍप्रोच रस्ता दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ

Omkar B

कर्मचारी व कामगारांसाठी नेत्र चिकित्सा शिबिर

Amit Kulkarni

बडेकोळमठाचा रस्ता तातडीने करा

Omkar B
error: Content is protected !!