विदेशी नागरिकाला अटक, पेडणे पोqिलसांची कारवाई
प्रतिनिधी
पेडणे
पेडणे पोलिसांनी खालचावाडा हरमल येथे धाड टाकून दीड लाख रुपये किंमतीचा अमली पदार्थ जप्त केला.अमली पदार्थ जवळ बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी बेलारुस येथील नागरिकाला अटक केली. पेडणे पोलीस निरीक्षक विक्रम नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खालचावाडा हरमल येथे एका गेस्ट हाऊस मध्ये एका विदेशी नागरिकाकडे अमली प्रदार्थ असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार पेडणे पोलिसांनी पोलीस निरीक्षक विक्रम नाईक यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक सुमेधा नाईक, उपनिरीक्षक विवेक हळर्णकर, हवालदार स्वप्नील, सचिन, महेश, सतीश, ड्रायव्हर डियोगो, कुंदन याचे पथक तयार केले. या पथकाने गेस्टहाऊस खोलीवर छापा टाकला. यात अमली प्रदार्थ समावेश असलेल्या 125 ग्रॅम वजनाच्या 28 नळकांडय़ा सापडल्या. बाजारपेठेत या अमली प्रदार्थाची किंमत रुपये 1,50,000/- आहे. अमली प्रदार्थ बाळगल्या प्रकरणी बेलारुस येथील नागरिकत्व असलेल्या अलियाक्सेई हॅलेंडुखिन वय 30, या विदेशी नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले व अमली प्रदार्थ प्रतिबंधात्मक कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक केली.
पुढील तपास पोलीस अधिक्षक शोबित सक्सेना आणि पेडणे उपअधिक्षक सिद्धांत शिरोडकर यांच्या देखरेखीखाली विक्रम नाईक करत आहेत.