Tarun Bharat

देवगड येथील बिबट्याच्या हत्येप्रकरणी चौकशीसाठी एकाला अटक

कणकवली / प्रतिनिधी-

देवगड तालुक्यातील मोंड, चिंचवड खाडीकिनारी प्लास्टिकच्या पोत्यामध्ये कुजलेल्या स्थितीत आढळलेल्या मृत बिबट्या प्रकरणी मोंड येथील महेश कृष्णा घाडी याला वनविभागाने चौकशीसाठी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून सांबराच्या अर्धवट कवटीसह शिंगे तसेच रानडुकराचा सुळा जप्त करण्यात आला असल्याची माहिती येथील वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घुणकीकर यांनी दिली.देवगड खाडी किनारी १ जुलै रोजी बिबट्याचे शव कुजलेल्या स्थितीत आढळून आले होते. याप्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 9, 39, 51 52 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबतच्या तपासात वन विभागाला मिळालेल्या माहितीनुसार मोंड येथील महेश कृष्णा घाडी  42 याची त्याचे राहते घरी बुधवारी पंचांसमक्ष झडती घेण्यात आली. यावेळी सांबराच्या अर्धवट कवटीसह शिंगाचा जोड, रानडुकराचा  सुळा आढळून आला.

त्याचेवर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 9, 39, 49, 44 (1)व 51 अन्वये गुन्हा दाखल करून पंचासमक्ष जप्त करण्यात आला.दरम्यान श्री. घाडी याला १ जुलै रोजी आढळलेल्या मृत बिबट्याच्या चौकशीकामी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. सदर बिबट्याच्या हत्तेबाबत कोणास काही माहिती असल्यास  ९५४५९७७८७७या मोबाईल नंबर वर संपर्क साधून माहिती द्यावी. त्याचे नाव गुप्त ठेवून वनविभागाच्यावतीने योग्य बक्षीस देण्यात येईल असेही वनविभागाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.दरम्यान या दाखल झालेल्या दोन्ही गुन्ह्यांबाबत प्रभारी उपवनसंरक्षक दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी सहाय्यक वनसंरक्षक अ. पा. शिंदे, कणकवलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घुणकीकर, सावंतवाडीचे वनपरिक्षेत्र म. अ. क्षीरसागर अ. बा. कटके, देवगड वनपरिमंडळ अधिकारी सारीक फकीर व इतर कर्मचारी करत आहेत.

Related Stories

जिल्ह्यात आणखी ३१ पॉझिटिव्ह

Archana Banage

बदल्यांसाठी शिक्षक संघटना आग्रही

Patil_p

दापोलीतून पाठवलेल्या २७४ पैकी १७७ जणांच्या स्वॅबचे अहवाल बाकी

Archana Banage

राजाचा आदेश प्रमाण, शिस्तीचे सर्वांना भान

NIKHIL_N

विलवडे गावचे सुपुत्र सुभाष दळवी यांना राष्ट्रीय ‘परंपरा पुरस्कार’ प्रदान

Anuja Kudatarkar

कोकण किनारपट्टी भागात थंडीचा कडाका वाढणार

Patil_p