Tarun Bharat

गोकुळ शिरगाव येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी एकाला अटक

गोकुळ शिरगाव/वार्ताहर

गोकुळ शिरगाव येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिसांनी आज एकाला अटक केली.
गोकुळ शिरगाव येथील (वय 15) असलेल्या मुलीला राहुल भैरू सूर्यवंशी (वय 36) मुळगाव केनवडे सध्या राहणार पसरिचा नगर उजळाईवाडी तालुका करवीर .याने मार्च 2022 ते 8 जून 2022 पर्यंत वेळोवेळी या मुलीला तिच्याबरोबर मैत्री करून तिच्या बरोबर सलगी वाढवून पुणे बेंगलोर महामार्गावर असलेल्या लॉजवर तसेच तामगाव (ता. करवीर ) या गावचे माळरानावर गाडी क्रमांक MH- 10 E-15 41 या गाडीमध्ये जबरदस्तीने बसवून तिला धारदार शास्त्राचा धाक दाखवून जबरदस्तीने तिच्यावर शारीरिक संबंध ठेवले. या जाचाला कंटाळून मुलीने आज गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात राहुल सूर्यवंशी याच्या विरोधात लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सी .ए. शिंगटे व पी. एस. पवार करीत आहेत.

Related Stories

कोल्हापूर : मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना भरपगारी सुट्टीचे आदेश

Archana Banage

कोल्हापूर : कुलगुरु नावांची यादी राज्यपालांच्या कार्यालयात

Archana Banage

इचलकरंजी मुख्याधिकारी पदाचा कार्यभार दीपक पाटील यांच्याकडे

Archana Banage

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेना लढवणार ५० ते १०० जागा

Abhijeet Khandekar

हुपरी माळभाग मोबाईल टॉवरने नागरिकांच्या जीवाला धोका

Archana Banage

गोकुळ शिरगाव येथील उद्योजकाची गळफास घेवून आत्महत्या

Abhijeet Khandekar