पेठ वडगाव/प्रतिनिधी
येथील युवकाचे बनावट फेसबुक खाते उघडून या अकाउंटवरून शहरातील प्रतिष्ठीत लोकांना शिवीगाळ केल्या प्रकरणी तसेच महिलांना अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी संबंधित युवकाने अज्ञाताविरोधात दाखल केलेल्या तक्रारी वरुन वडगाव पोलिसांनी तपास करून या प्रकरणी आकाश राजेंद्र मिरजकर (वय २२, रा.पेठ वडगाव, ता. हातकणंगले) याला ताब्यात घेतले. त्याने या कृत्याची कबुली दिली असून त्याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत पोलिसातून घेतलेली माहिती अशी की, पेठ वडगाव येथील सागर नामदेव शिंदे यांचे नावचे अनोळखी व्यक्तीने सोशल मिडीयाचे फेसबुकवर बनावट अकाऊंट सुरु करून त्यावर सागर शिंदे यांचा फोटो अपलोड करून या फेसबुक अकाऊंटवरून येथील एकाचा भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून फोटो पोस्ट केला. यामुळे त्या व्यक्तीमध्ये व शिंदे यांच्यात वाद होवून गावातील वातावरण खराब होईल. तर फेसबुकवरून शहरातील लोकांना वाईट शिवीगाळ तसेच दमदाटी केली. तर व्हॉटसअप अकाऊंटवर फिर्यादी शिंदे याचा फोटो लावून पेठ वडगाव शहरातील प्रतिष्ठीत व्यक्तींना शिवीगाळ करून दमदाटी केली. शिंदे याची बदनामी व्हावी तसेच त्याला कोणीतरी मारहाण करून त्याच्या जीवितास धोका व्हावा या उद्देशाने सोशल मिडीयाचा वापर केली असल्याची फिर्याद सागर शिंदे यांनी वडगाव पोलिसात दिली होती.. या प्रकरणी वडगाव पोलिसात गुन्हा दाखल होता.
या गुन्हाच्या तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक संतोष घोळवे व त्यानंतर सध्याचे पोलीस निरीक्षक बी.ए.तळेकर यांनी केला. या गुन्ह्यातील अनोळखी इसम याचा शोध घेण्याकरिता तांत्रिक माहिती प्राप्त करून या प्रकरणी हा गुन्हा करणारा आकाश राजेंद्र मिरजकर (वय२२ रा.हनुमान मंदिर पाठीमागे पिसे गल्ली, पेठ वडगाव) यास ताब्यात घेवून त्याचे कडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे मान्य केले. वडगाव शहरातील महिलांना अश्लील मेसेज केले तसेच दोन गटामध्ये भांडण लावून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्न करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी त्यास अटक करण्यात आली आहे. सोशल मिडीयाचा गैरवापर करून गुन्ह्यात अडकू नका : पोलीस निरीक्षक बी.ए.तळेकर
सोशल मिडियाचे फेसबुक, व्हॉटसअप, इन्स्टाग्राम यांचा गैरवापर करून वैयक्तिक तसेच सामाजिक जीवनात लोकांच्या भावना भडकावणे, बदनामी करणे हा कायद्याने गुन्हा असून अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्यास महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत. अशा प्रकारचे गुन्हे कोणीही करू नयेत. सोशल मिडीयाच्या चुकीच्या वापरावर पोलीस प्रशासन लक्ष ठेवून आहे. सोशल मिडीयाचा वापर चांगल्या कामासाठी करावा असे आवाहन वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी.ए.तळेकर यांनी केले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, डीवायएसपी रामेश्वर वैंजणे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक बी.ए.तळेकर यांनी केला. या तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक गिरीश शिंदे, पोलीस अंमलदार रणवीर जाधव, संदीप गायकवाड, दादासो माने, प्रमोद चव्हाण यांचा समावेश