प्रतिनिधी /पेडणे
पेडणे पोलिसांच्या पथकाने शनिवारी हरमल येथे टाकलेल्या छाप्यात 49 हजार रुपयांचा अमलीपदार्थ जप्त करण्यात आला. गोपनीय माहितीच्या आधारे, पोलिसांनी ही कारवाई केली.
संशयित अहसान मुजीबर रहमान खान (वय 28, रा. गेडेन अय्यप्पा नगर, सुपेला भिलाई दुर्ग, छत्तीसगढ) असे त्याचे नाव आहे. पोलीस निरीक्षक दत्ताराम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विवेक हळर्णकर, उपनिरीक्षक हरीश वायंगणकर, प्रेमनाथ सावळ देसाई, वासू सावंत, प्रज्योत मयेकर, रजत गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. यावेळी संशयित अहसानकडून 49.3 ग्रॅम वजनाचे चरस जप्त केले. संशयितास अटक करण्यात आली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. एसडीपीओ सिद्धांत शिरोडकर व पथकाकडून तपास सुरू आहे.