मच्छिमाराच्या जाळय़ात अडकला दुतोंडी मासा
सोशल मीडियाव एक अजब कार्प माशाचा व्हिडिओ मोठय़ा प्रमाणात शेअर केला जात आहे. या माशाला दोन तोंडं आणि 4 डोळे आहेत. सोव्हियत महासंघाच्या काळातील चर्नोबिल अणुप्रकल्पातील गळतीच्या प्रभावामुळे हा मासा अशाप्रकारे जन्माला आल्याचे ट्विटर युजर्स म्हणत आहेत. हा मासा कुठल्याही प्रकारच्या प्रदूषणामुळे अशाप्रकारे जन्माला आला की नाही हे वैज्ञानिक अद्याप स्पष्ट करू शकलेले नाहीत.
दोन तोंडं असूनही कार्प मासा पूर्णपणे चांगल्या स्थितीत आहे. बहुतांशकरून किरणोत्सर्गामुळे होणारे म्युटेशन विकास रोखणारे असते. याचबरोबर जिवंत राहण्याची आणि प्रजनन क्षमता कमी होत असल्याचे अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलिना विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ डॉ. टिमोथी मूसो यांचे म्हणणे आहे.


अशाप्रकारचे म्युटेशन अधिक काळ जिवंत राहू शकत नाहीत. बहुतांशकरून असे जीव कमी सक्षम असलयाने ते एखाद्या प्राण्याकडून किंवा माणसांकडून मारले जाण्याची शक्यता वाढत असल्याचे प्राध्यापक मूसो यांचे म्हणणे आहे. मूसो यांनी चेर्नोबिलमधील दुर्घटनेचे अध्ययन केले आहे. माशासोबत काय चुकीचे घडले यासंबंधी अचूक माहिती केवळ प्रयोगशाळेत मिळू शकते असे त्यांनी म्हटले आहे.