Tarun Bharat

कोडोलीत एकाची गळफास लावून आत्महत्या

वारणानगर / प्रतिनिधी

वाडीहुंडब,कोडोली ता. पन्हाळा येथील एकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.दत्तात्रय सहदेव मांजरेकर (वय ४२) असे त्याचे नाव आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दत्तात्रय याने राहत्या घरातील सिलींग फॅनला नॉयलॉन दोरीने आज शुक्रवार दि. ९ रोजी दुपारी साडेचार च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. या बाबतची वर्दी दत्तात्रय याचे चुलत भाऊ प्रकाश मांजरेकर याने पोलिसांत दिली आहे. दत्तात्रय याच्या मागे पत्नी, आई वडील दोन मुले असा परिवार आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबलसुतार करत आहेत.

Related Stories

यंदाची महाराष्ट्र केसरी नेमकी कोणाची?

Archana Banage

गुप्तधनाच्या लालसेपोटी कोल्हापुरातील महिलेचा खून ; संशयिताला अटक

Archana Banage

मायक्रो फायनान्स कंपनीच्या दमदाटी विरोधात महिलांचा मोर्चा

Archana Banage

संजय राऊतांविरोधात NCP नेत्यांची शरद पवारांकडे तक्रार

Abhijeet Khandekar

पावनखिंड येथे मद्यधुंद तरुणांची स्थानिकांकडून धुलाई

Archana Banage

कोवाडला अभय पतसंस्थेत चोरी; तब्बल 75 तोळे सोन्यावर डल्ला

Archana Banage