Tarun Bharat

कुडासे येथे एक दिवस बळीराजासाठी उपक्रम संपन्न

One day activities for Baliraja in Kudase

कुडासे येथे एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमाअंतर्गत जिल्हा कृषी अधिकारी डी.एस. दिवेकर, उपविभागीय कृषी अधिकारी अजित अडसुळे यांनी क्षेत्र पाहणी केली.बुधवारी प्रथम भाऊ देसाई, सुलोचना नाना देसाई, शिवाजी देसाई यांच्या काजू, मग्रारोहायो फळबाग लागवड पाहणी व मार्गदर्शन केले. तसेच भात पिक स्पर्धा योजनेतील शेतकरी देवीदास विष्णु सावंत यांचे शेतावर भात पीक कापणीची पाहणी केली. यावेळी सरपंच पूजा देसाई, तालुका कृषी अधिकारी प्रमोद बनकर, कृषी सहाय्यक श्री. ताटे, सरिता सावंत , पार्वती देसाई, निकिता सावंत, अक्षता सावंत या शेतकरी महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

गावातील शेतकरी यांना रब्बी क्षेत्र वाढ योजनेतून मसूरचे बियाणे सरपंच पूजा देसाई यांचे हस्ते वाटप करण्यात आले. तसेच वन्य प्राणी नुकसान व बंधारा बांधकाम याबाबत उपस्थित ग्रामस्थांनी विचारणा केली. याबाबत ग्राम पाणलोट समिती मार्फत कामे सुचाविण्याबाबत श्री. दिवेकर यांनी सांगितले. यावेळी प्रमोद बनकर यांनी पी.एम.एफ.एम.ई प्रक्रिया योजनेत कुडासे गावातील शेतकरी यांनी अर्ज  करण्याचे आव्हान उपस्थित शेतकऱ्यांना केले.

दोडामार्ग – वार्ताहर

Related Stories

मराठीतील लोकप्रिय कवितांचा वीस बोलीभाषांमध्ये अनुवाद

NIKHIL_N

अबब…रत्नागिरीत झेंडूची फुले तब्बल 400 रुपये किलो!

Patil_p

कवी कमलेश गोसावी यांना परमाणू उर्जा सचिवालयाकडून निमंत्रण

Anuja Kudatarkar

शाळा सुरू होणार पण शिक्षकांना आरटीपीसीआर बंधनकारक

Anuja Kudatarkar

शिवसेनेने आयत्या बिळावर नागोबा बनू नये!

NIKHIL_N

घरडा कंपनीत स्फोट 4 कामगारांचा मृत्यू

Patil_p