Tarun Bharat

फौंड्री क्लस्टरमध्ये एकदिवसीय विकास कार्यक्रम

प्रतिनिधी / बेळगाव

अंगडी इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या एमबीए विभाग, बेळगाव फौंड्री क्लस्टर व इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियन फौंड्रीमन बेळगाव चॅप्टरच्यावतीने एकदिवसीय व्यवस्थापन विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उद्यमबाग येथील फौंड्री क्लस्टरच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. सुरेश अंगडी फौंडेशनच्या संचालिका डॉ. स्फूर्ती अंगडी कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

व्यासपीठावर उद्योजक प्रकाश पंडित, उद्योजक गौरव पंडित, उद्योजक विक्रम सैनुचे, राजू जोशी, प्राचार्य डॉ. आनंद देशपांडे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी उद्योजक सदानंद हुंबरवाडी होते. डॉ. स्फूर्ती अंगडी यांनी, उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे. अंगडी इन्स्टिटय़ूटच्या सहयोगाने उद्योग क्षेत्रासाठी लागणारे प्रशिक्षण व सेवा दिल्या जातील, असे सांगितले. प्रकाश पंडित यांनी कुशल कारागिरांची वानवा असल्याने प्रशिक्षण देणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. सदानंद हुंबरवाडी यांनी अध्यक्षीय भाषणात लघु व मध्यम उद्योगांसमोर असणाऱया अडचणी व त्यांचा सामना कसा करावा, याची महिती दिली. प्रा. विशाल बोगार यांनी परिचय करून दिला. एन. एम. खतीब यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शीतल पवार यांनी केले. डॉ. एस. आर. भरमाईकर, डॉ. सूर्यकुमार खनाई यांनी मार्गदर्शन केले. कुशल कारागिरांचे व्यवस्थापन, नवीन उपकरणे यासह तांत्रिक मुद्दय़ांवर त्यांनी मार्गदर्शन केले.

Related Stories

आंबेवाडी येथे साऊंड सिस्टीम जप्त

Amit Kulkarni

अनमोड घाटात वाहन दरीत कोसळले

Amit Kulkarni

वरवर शांततेचे वारे मात्र राखेखाली निखारे

Amit Kulkarni

भाकड जनावरांचा प्रश्न मार्गी

Amit Kulkarni

गटारी तुंबल्याने पावसाचे पाणी दुकानामध्ये

Amit Kulkarni

राष्ट्रीय महामार्गाशेजारील सर्व्हिस रस्त्याची चाळण

Patil_p