Tarun Bharat

TRAVEL BLOG: सुट्टीचा आनंद घ्यायचा आहे?, तर कोकणातील ‘या’ ठिकाणाला नक्की भेट द्या…

फिरणं हा प्रत्येकाचा आवडीचा छंद… सुट्टी मिळाली की आपण कुठं ना कुठं फिरायला जातोच… एक-दोन दिवसांची सुट्टी असल्यास नेमकं कुठं फिरायला जायचं हा अनेकांसमोर प्रश्न असतो… पण असं एक ठिकाण आहे जे तुम्हा सर्वांना आवडेल. ते म्हणजे ‘विजयदुर्ग’…

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

अजिंक्य आणि अभेद्य असणारा विजयदुर्ग हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यामध्ये आहे. विजयदुर्ग हा किल्ला जलदुर्ग प्रकारातील असून या किल्ल्याचे तिन्ही बाजूने पाणी आणि एका बाजूने जमीन आहे जेथून किल्ल्यामध्ये प्रवेश केला जातो. ३० मीटर उंच खडकावर आहे. या किल्ल्याची तटबंदीची भिंत ३०० फुट उंच आहे आणि किल्ल्याची भिंत हि १० मीटर उंच आहे. या किल्ल्याभोवती तीन बिनती आहेत एक आहे ती समुद्र किनाऱ्या लागत आहे. दुसरी बुरुजांची म्हणजेच संरक्षक भिंत आणि तिसरी मुख्य किल्ल्याची भिंत.

हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगतो. विजयदुर्गचा किल्ला किल्ल्यातील ही सुंदर रचना पाहणे मनोरंजक असेल. तुम्हालाही सिंधुदुर्ग किल्ला आणि त्यातील प्रमुख पर्यटन स्थळांबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर हा ब्लॉग नक्की वाचा….

हनुमान मंदिर
आपल्यला किल्ल्यामध्ये जाताना सुरुवातीला एक हनुमानाचे मंदिर आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात आल्यानंतर बांधले आहे. असे म्हणतात कि समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु होते आणि समर्थ रामदास यांची हनुमानावर भक्ती होती त्यामुळे आपल्यला शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ल्यांवर आपल्यला हनुमान मंदिरे पाहायला मिळतात.

तिहेरी तटबंदी
समुद्राच्या जवळची तटबंदी म्हणजे पडकोट खुश्की, दुसरी तटबंदी बुराजांच्या भोवती आणि तिसरी तटबंदी किल्ल्याच्या भोवती आहे.

गोमुखी दरवाजा
गोमुखी दरवाजा हा दरवाजा म्हणजे किल्ल्याचे प्रवेशदार. या किल्ल्याच्या प्रवेशदाराची रचना अशी केली आहे कि हे दार किल्ल्याजवळ गेल्याशिवाय दिसत नाही.

ध्वजस्तंभ
खलबत खाण्यापासून थोडे पुढे गेल्यानंतर आपल्यला ध्वजस्तंभ दिसतो. ध्वजस्तंभावर किल्ल्यावर ज्यांचे वर्चस्व आहे त्यांचा झेंडा फडकवला जात असतो.

जीभीचा दरवाजा
किल्ल्याच्या दरवाजातून पुढे गेल्यानंतर एक छोटा दरवाजा लागतो ज्याला जीभीचा दरवाजा म्हणतात.

खुबलढा बुरुज
खुबलढा बुरुज हा किल्ल्यावरील प्रसिध्द बुरुज आहे ज्याचा वापर समुद्रावरील शत्रूंच्या तोफांनी मारा करण्यासाठी केला जाता होता तसेच या बुजुजावरून समुद्री शत्रूवर लक्ष देखील ठेवले जात होते. या बुरुजावर जाण्यासाठी एका भुयारी मार्गाचा वापर केला जात होता.

गुहा
विजयदुर्ग किल्ल्यावर आपल्याला वेगवेगळ्या गुहा देखील पाहायला मिळतात.

खलबत खाना
खलबत खाण्यामध्ये गुप्त खलबती चालतात म्हणजेच या खलबत खाण्यामध्ये गुप्त राजकारण किवा मोहिमांचे पूर्वनियोजन व्हायचे.

सदर
किल्ल्याच्या आतल्या बाजूमध्ये आपल्यला एक इमारत पाहायला मिळते जी अजूनही सुस्थितीत आहे आणि ती भोज राजाने बांधली होती.

सुरंग
जर शत्रूने अचानक हल्ला केला तर बचावासाठी किल्ल्यामध्ये दोन सुरंग बनवल्या होत्या एक सुरंग किल्ल्याच्या पूर्वेकडे आणि दुसरी सुरंग किल्ल्याच्या पश्चिमेकडे आहे.

विजयदुर्ग किल्ला पाहायला जाण्यासाठी तुम्ही फ्लाइट, ट्रेन आणि बस यापैकी एक निवडू शकता आणि विजयदुर्ग किल्ल्यावर सहज पोहोचू शकता.

कोकणाचं निसर्ग सौंदर्य सर्वानाच भुरळ घालतं. सिंधुदुर्ग पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील महत्वाचा जिल्हा आहे. कोकणातील अनेक पर्यटनस्थळे सर्वानाच वारंवार पाहावीशी वाटतात. त्यापैकीच सर्वांना आवडणारे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा विजयदुर्ग किल्ला प्रत्येकाने एकदातरी पहिला असेलच… पण पहिला नसेल तर या ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या..

Related Stories

पावसाळ्यात जोडीदारासोबत फिरायचा प्लॅन करताय…. तर मग नक्की वाचा

Abhijeet Shinde

Kolhapur Tourism: पर्यटकांनो कोल्हापुरात येताय तर, ही ठिकाणे नक्की बघा…

Abhijeet Shinde

248 आसनी विमानातून एकटय़ाने प्रवास

Amit Kulkarni

चार धाम यात्रेतील मृतांची संख्या कशामुळे वाढली;चला पाहूया…

Kalyani Amanagi

तुम्हाला स्वित्झर्लंडचा अनुभव घ्यायचायं; भारतातील ‘या’ हिल स्टेशनला द्या भेट

Abhijeet Shinde

परदेशात ट्रिपचे प्लॅनिंग करतायं? या 10 टिप्सचा होईल फायदा

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!