Tarun Bharat

सावंतवाडीच्या जगन्नाथराव भोसले उद्यानात महिलांसाठी एकदिवसीय योगाभ्यास व योगा स्पर्धा आयोजन

One day yoga practice and yoga competition organized for women at Jagannathrao Bhosle Udyan, Sawantwadi

रविवारी 11 डिसेंबर रोजी सकाळी पार पडणार कार्यक्रम

सावंवाडीतील जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानात रविवार दिनांक 11 डिसेंबर 2022 रोजी सकाळच्या सत्रात सूर्यनमस्कार सहित संपूर्ण योगावर्गाचे आयोजन करण्यात आले असून योगाभ्यासानंतर 100 सूर्यनमस्कार व आपल्या आवडीचे कोणतेही एक योगासन अशी सर्व महिलांसाठी मुक्त स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानात रविवारी सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत योगा वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत संपूर्ण योगाभ्यास, सूर्यनमस्कार, ओमकार, प्राणायाम इत्यादी योगावर्ग होणार असून सकाळी 8 ते 9 असा एक तास 100 सूर्यनमस्कार व आवडीचे कोणतेही एक शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेले योगासन अशी स्पर्धा होईल. ही स्पर्धा सर्व महिलांसाठी आयोजित केलेली आहे. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्या क्रमांकाना मेडल्स दिली जाणार आहेत. तरी योगाभ्यास करणाऱ्या जास्तीत जास्त महिलांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन सौ.भूमी पटेकर, सौ.रेखा कुमठेकर, सौ.आदिती नाईक, सौ.सारिका पुनाळेकर व सौ.मोहिनी मडगावकर यांनी केले आहे.

सावंतवाडी / प्रतिनिधी

Related Stories

आणखी सहा नमुने तपासणीसाठी

NIKHIL_N

खरेदी-विक्री संघाकडून सेंद्रीय खत निर्मिती

NIKHIL_N

रेल्वे प्रकल्पग्रस्तांना सामावून न घेतल्यास आंदोलन

Patil_p

श्री सातेरी देवी शिखर कलश स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

Anuja Kudatarkar

अर्सेनिक अल्बम 30 साठी व्याज परत घेणे असंयुक्तिक

NIKHIL_N

विकसित सिंधुदुर्गचे दर्शन घडविणारा लघुपट

NIKHIL_N