पुणे : दुबईहून पुणे विमानतळावर स्पाईस जेटच्या विमानातून आलेल्या एका प्रवाशाकडून 1 किलाे 166 ग्रॅम वजनाची साेन्याची दहा बिस्किटे पुण्यातील लाेहगाव विमानतळावर कस्टम विभागाच्या पथकाने जप्त केली. प्रवाशांच्या सीटखाली एका काळया रंगाच्या प्लास्टिकच्या पिशवीत ही साेन्याची दहा बिस्किटे आढळून आल्याची माहिती कस्टम विभागाने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून स्पाईस जेटचे एसजी-52 हे विमान दाखल झाले हाेते. हे विमान पुढे देशांतर्गत वाहतूकीसाठी रवाना हाेणार हाेते. परंतु, त्यापूर्वी विमानाची सीमा शुल्क विभागाकडून तपासणी करण्यात येत हाेती. त्यावेळी विमानात एका प्रवाशाच्या सीटखाली काळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या एका पिशवीत दहा साेन्याची बिस्कीटे कस्टम विभागाच्या पथकास आढळून आली.
अधिक वाचा : आदर पूनावाला यांच्या नावाने बनावट मेसेज पाठवून एक काेटीचा गंडा
कस्टम विभागाच्या पथकाने ही सोन्याची बिस्किटे सीमाशुल्क कायदा 1962 नुसार जप्त केली असून, त्याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे. बाजारभावानुसार 1 किलाे 166 ग्रॅम वजनाच्या दहा बिस्किटांची किंमत 61 लाख 70 हजार रुपये आहे. नेमके हे साेने तस्करी करुन काेणी आणले हाेते आणि ते काेणाला व कशाप्रकारे दिले जाणार हाेते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.