Tarun Bharat

मोटार सायकल अपघातात एक ठार,तर दोघे गंभीर जखमी

पुलाची शिरोली/ प्रतिनिधी

दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार तर दोघे जखमी झाले आहेत.अतुल अंकुश गुडाळे वय ३२, रा. नागाव हा तरुण कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात उपचार सुरू असताना मध्यराञी मयत झाला.तर स्वप्नील उर्फ संभाजी कांबळे व अविनाश कांबळे अशी जखमींची नावे आहेत. हा अपघात पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर असणाऱ्या सेवा मार्गावर नागाव येथील राजेश मार्बल समोर शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडला.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की,अतुल कुडाळे हा मोटारसायकल वरून नागाव फाट्याच्या दिशेने निघाला होता. त्याचवेळी अविनाश कांबळे व स्वप्नील कांबळे हे दोघे मोटार सायकल वरून नागाव येथील डॉ. आंबेडकर नगर मधून शिरोली एमआयडीसीकडे निघाले होते. महामार्गाला समांतर असणाऱ्या सेवा मार्गावरील राजेश मार्बल येथे या दोन्ही मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाली. दोघांच्याही मोटारसायकली भरधाव वेगाने असल्याने तिघेही गंभीर जखमी झाले.अतुल गुडाळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तर अविनाश व स्वप्निल हेही गंभीर जखमी आहेत. तिघांवरही कोल्हापुरातील सरकारी दवाखान्यात उपचार सुरू होते. पण उपचार सुरू असताना अतुल गुडाळे याचा मृत्यू झाला. त्याच्या आकस्मिक मृत्यूची बातमी समजताच गावावर शोककळा पसरली आहे.

Related Stories

शाहूवाडीत कोरोनाचा धोका वाढला; रात्री उशिरा ९ जण पॉझिटिव्ह

Archana Banage

कोल्हापूर : ऋषिकेश पाटील यांच्यावर पश्चिम महाराष्ट्र समन्वयकपदाची जबाबदारी

Archana Banage

राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत प्रेरणा कोळी प्रथम

Archana Banage

सीपीआरमधील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यास प्राधान्य

Archana Banage

सावर्डे पाटणकरमध्ये रक्तदान शिबिर संपन्न

Archana Banage

कोल्हापूर : ४० वर्षाच्या आरोग्य सेवेचा खरा आरोग्यदूत हरपला

Archana Banage