Tarun Bharat

गोवा वेल्हा येथील अपघातात 1 ठार

Advertisements

तीन वाहनामध्ये झाला अपघात : वाहनांच्या दर्शनी भागांचा चक्काचुर

प्रतिनिधी /पणजी

 गोवा वेल्हा बायपास रस्त्यावर शुक्रवारी सकाळी तीन वाहनामध्ये झालेल्या भिषण अपघातात एक जागीच ठार झाला आहे. अपघात इतका भयानक होता की वाहानांच्या दर्शनी भागांचा चक्काचुर झाला आहे. याबाबत आगशी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचा पंचनामा करून जखमींना गोमेकॉत दाखल केले.

पोलासंनी दिलेल्या माहितीनुसार अरफान खान (न्यु वाडा वास्को) असे अपघातात जागीच ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. माल वाहक गाडीला ठोकर दिलेल्या वाहनातील चालक व क्लिनर हे किरकोळ जखमी झाले असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले. माल वाहक जीप, स्विफ्ट कार व विंगर कार यांच्यात हा अपघात झाला आहे. स्विफ्ट कार पणजीहून वास्कोच्या दिशेने जात होती गोवा वेल्हा येथे उड्डाणपूल संपल्यानंतर बगल रस्त्याच्याठिकाणी स्वीफ्ट कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार दुभाजकावर चढून पणजीकडे येणाऱया रस्त्यावर गेली त्याचवेळी समोरून येणाऱया मालवाहक जीपला जोरदार धडक दिली. कालचालक जागीच ठार झाला. आगशी पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

‘ओमिक्रॉन’ची सरकारकडून गंभीर दखल

Patil_p

राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था 31 जुलैपर्यंत बंद

Patil_p

ताळगांव येथे पंचायत गृह आवश्यक

tarunbharat

व्हीपीके अर्बनवर परिवर्तन

Amit Kulkarni

अन्यथा प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांनी सुनावणीस हजर राहावे

Amit Kulkarni

ग्रामीण शिक्षक ते…ग्लोबल शिक्षकपर्यत मजल मारणारा डॉ. अशोक प्रियोळकर

Amit Kulkarni
error: Content is protected !!