प्रतिनिधी/ खंडाळा
सातारा-पुणे मार्गावर एस कॉर्नर जवळ सिमेंट वाहतुक करणाया भरधाव टॅकरने चार वाहनांना धडक दिली.यामध्ये सांगली जिह्यातील मांगले येथील सचिन ऊर्फ रंणजित मानसिंग जाधव ( वय 23 ) हा गंभीर जखमी होऊन मयत झाला.तर अन्य सहा जण जखमी झाले . यापैकी तीघांची प्रकृती गंभीर आहे . यामध्ये अपघातग्रस्त चार वाहनांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले .
याबाबत घटनास्थळ व पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता महामार्गावरील बेंगरुटवाडी ( ता .खंडाळा ) गावच्या हद्दीत उड्डाण पुलाचे काम सुरु असलेल्या ठिकाणी हा अपघात झाला.चालक श्रीशैल मारुती कांबळे (वय -38 वर्षे , रा.उमारनी , ता.इंडी , जि.विजायाकुरुमरानी , बिजापुर राज्य – कर्नाटक ) याच्या ताब्यातील सातारा बाजुकडून पुण्याकडे जाणाया सिमेंटची वाहतुक करणाया ट्रक टॅकर भरधाव वेगात पीकअप जीपला प्रथम धडक दिली . त्यानंतर अल्टोकार , आयशर टेम्पोला धडक देऊन एस कॉर्नर क्रॉस करून समोरील भरावावर टँकर गेला व तेथे जाऊन ट्रक्टरवर पलटी झाला .
दरम्यान, पिकअप मधील इसम सचिन ऊर्फ रणजित मानसिंग जाधव ( वय – 23 वर्षे रा मांगले,ता.शिराळा ) हा मयत झाला. तर रोहित संजय जाधव वय 18 वर्षे , गणेश अनिल तडाखे वय – 25 वर्षे , सर्व रा . मांगले , ता.शिराळा , जि.सांगली, शकिल दावत शेख वय -34 वर्षे , किरण वैजिनाथ शिंदे वय -18 वर्षे , दोघे रा.काळेवाडी फाट , थेरगाव , पिंपरी , पुणे ,प्रदिप आमशिदा बेल्लेनवार वय -36 वर्षे , रा.उमारनी , ता.इंडी ,जि. विजायाकुरुमरानी , बिजापुर , राज्य – कर्नाटक ,राहुल मोहन वायदंडे रा.खंडाळा , ता . खंडाळा , जि . सातारा हे जखमी झाले.
सदर अपघाताची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस अधिक तपास करित आहेत.