अक्कलकोट प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट स्टेशन येथे घरगुती बाजार करून घराकडे जात असणाऱ्या एकास पिकप गाडीने जोरात धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला. जगन्नाथ शामराव राठोड (वय ५२) रा.अंबाबाई मंदिराजवळ अक्कलकोट रेल्वे स्टेशन असे अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की, मयत जगन्नाथ शामराव राठोड हे अक्कलकोट स्टेशन येथून घरगुती सामान घेऊन अक्कलकोट जाणाऱ्या रोडने घराकडे पायी चालत जात असताना अक्कलकोट कडून अक्कलकोट स्टेशनकडे जाणारा पिकअप एमएच १५ ए.जे ०७८१ या चार चाकी वाहनावरील अज्ञात चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वाहन चालवून जगन्नाथ राठोड यांना समोरून जोरात धडक दिली. या धडकेमुळे त्यांचा मृत्यू झाला. या संदर्बातील फिर्याद त्यांचा मुलगा चंद्रकांत राठोड यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात दिली. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल शेख हे करत आहेत.