Tarun Bharat

राष्ट्रवादीचा मोठा नेता लवकरच जेलमध्ये जाणार; मोहित कंबोज यांचं ट्विट

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

सिंचन घोटाळ्याची चौकशी व्हावी. तसेच लवकरच राष्ट्रवादीचा बडा नेता तरुंगात जाणार असल्याचे भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी म्हटले आहे. दरम्यान, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राज्यातील मागील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे तरुंगात आहेत. त्यानंतर आता आणखी एक राष्ट्रवादीचा नेता लवकरच तरुंगात जाणार आहे, असे कंबोज यांनी सांगितले आहे.(one ncp big leader irrigation scam case will meet nawab malik and anil deshmukh mohit kamboj bharatiya tweet)

मोहित कंबोज पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीचा कोणता नेता जेलमध्ये जाणार त्या नेत्याचे नाव आणि त्याच्या घोटाळ्यांची माहिती देणार आहेत. यासंदर्भात कंबोज यांनी तीन ट्विट केले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रीवादीच्या नेमक्या कोणत्या नेत्याचा घोटाळा कंबोज उघडकीस आणणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

“राष्ट्रवादीच्या संबंधीत नेत्याच्या सिंचन घोटाळ्याची फाईल २०१९ साली बंद करण्यात आली होती”, असे स्पष्ट संकेत मोहित कंबोज यांनी दिले आहेत. “राष्ट्रवादीच्या या नेत्याच्या बेनामी कंपन्या, त्यांच्या गर्लफेंडच्या नावावर असलेली संपत्ती, भ्रष्टाचाराची माहिती आपण देणार आहोत” असे कंबोज यांनी म्हटले. या संदर्भात कंबोज यांनी तीन ट्वीट केले आहेत. या ट्विटनुसार “एनसीपीचा एक बडा नेता नवाब मलिक आणि अनिल देशमुखांप्रमाणे तुरुंगात जाणार आहे”, असे मोहित कंबोज यांनी पहिल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

“राज्यातील सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी झाली पाहिजे. या घोटाळ्याची फाईल परमबीर सिंह यांच्या काळात, 2019 साली बंद करण्यात आली होती”, असे मोहित कंबोज यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

“लवकरच आपण राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा पर्दाफाश करणार आहे. त्या नेत्याची भारतातील संपत्ती, देशाबाहेरील संपत्ती, बेनामी कंपन्या, त्याच्या गर्लफ्रेंडच्या नावावरील संपत्ती, त्याने मंत्रीपदावर असताना केलेला भ्रष्टाचार, त्याच्या कुटुंबाच्या संपत्तीची यादी याची माहिती देणार आहे”, असे मोहित कंबोज यांनी तिसऱ्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

.

Related Stories

महिंद्राचे ट्रक्टर्सही महागणार

Omkar B

कोरोनाप्रतिबंधासाठी दिल्ली सरकारचा 5 टी फॉर्म्युला

Patil_p

संभाजीराजेंबद्दल शिवसेना-काँग्रेसला विचारावे लागेल- शरद पवार

Rahul Gadkar

हज यात्रेसाठी अर्ज केलेल्यांना मिळणार पूर्ण पैसे परत

datta jadhav

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी आज मतदान

datta jadhav

मला गाडीने नको, विमानाने न्या; नाहीतर…

datta jadhav
error: Content is protected !!