Tarun Bharat

सर्वात भीतीदायक घरांपैकी एक

Advertisements

160 वर्षांपासून लोकांच्या भीतीचे ठरले आहे कारण

भय हे माणसाच्या मनात असते आणि भूत-प्रेतांचे अस्तित्व नसते असे म्हटले जाते, परंतु तरीही लोकांसोबत काही असे अनुभव घडतात, ज्यामुळे या नजरेस पडणाऱया गोष्टींच्या पलिकडेही काहीतरी अस्तित्वात आहे, ज्याची व्याख्या करता येत नाही अशी धारणा तयार होते.  जगात अशा अनेक जागा आहेत, जेथे भूत असल्याचा दावा लोक करत असतात. ब्रिटनमध्ये 160 वर्षे जुने घर असून त्याला देशातील सर्वात भीतीदायक घर मानले जाते.

1862 मध्ये बोर्ले रेक्टरी नावाच्या या घराची निर्मिती इंग्लंडच्या एसेक्समध्ये झाली होती. तेथे बोर्ले नावाची एक छोटीशी वस्ती आहे. हे घर एक रेक्टरीच्या स्वरुपात तयार करण्यात आले होते. रेक्टरीमध्ये धर्मगुरुंचे वास्तव्य असते. या रेक्टरीची निर्मिती हेन्री डॉनस एलिस बुल यांनी करविली होती, बुल हे एक वर्षांनी रेक्टर झाले होते आणि या घरात ते  कुटुंबासोबत रहायला  आले होते. घराच्या निर्मितीपासूनच याला भुताटकीचे घर म्हटले जाऊ लागले. याच्या निर्मितीपूर्वी तेथे दुसरी रेक्टरी होती, जी 1841 मध्ये लागलेल्या एका आगीमुळे पूर्णपणे नष्ट झाली होती.

अनेक विचित्र घटना

या घराच्या निर्मितीच्या काही काळापासूनच तेथे विचित्र घटना घडू लागल्या होत्या असा दावा अनेक लोकांनी केला आहे. रात्री उशिरा घरातून कुणीतरी चालण्याचा आवाज यायचा असे या लोकांचे म्हणणे होते. 1900 सालच्या सुमारास हेन्रीच्या मुलींना एका ननचे भुत घराबाहेर दिसून आल्याचे सांगण्यात येते. तर मुंडकी नसलेल्या दोन भूतांना घोडागाडी चालवताना पाहिल्याचा दावा काही लोकांनी केला होता.

घरावर झाले संशोधन

काळासोबत विचित्र घटनांचे प्रमाण वाढत गेले. सामान आपाओप हलू लागले, तर घरात अचानक आग लागल्याचा दावा करण्यात आला. 1937-1938 पर्यंत हॅरी प्राइस नावाचा एक व्यक्ती याच घरात राहिला. प्राइस प्रत्यक्षात सायकिक रिसर्चर होता, जो भूतांवर संशोधन करायचा. त्याने 1940 मध्ये एक पुस्तक लिहिले ज्यात या घरात भूत असल्याचे नमूद केले. आज देखील या घराला इंग्लंडमधील सर्वात भुताटकीयुक्त घर मानले जाते.

Related Stories

डीआरडीओकडून बायो सूटची निर्मिती

Patil_p

कुंभमेळय़ात 1700 जणांना कोरोनाबाधा

Amit Kulkarni

उपराज्यपालच दिल्लीचे ‘सुपर बॉस’

Patil_p

लघू-मध्यम उद्योजकांसाठी ऍमेझॉन निधी उभारणार

Patil_p

पंतप्रधान जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार

Patil_p

आक्षेपार्ह घोषणांसाठी मुलाला मिळाले होते प्रशिक्षण

Patil_p
error: Content is protected !!