खानापूर : जांबोटी-हब्बनहटी रस्त्यावर मोरीच्या कठडय़ाला ठोकरल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली.
जांबोटी येथील मारुती व्हण्णाप्पा पट्टेकर (वय 52) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. मारुती हे हब्बनहट्टी येथील आपल्या शेतीकडे जात असताना दुचाकी (स्प्लेंडर केए 22 इ डब्ल्यू 7092) वरून जाताना नियंत्रण सुटल्याने मोरीच्या कठडय़ाला जोरदार धडक दिली. तोंडाला व डोकीला जोराचा मार बसल्याने मारुती पट्टेकर हे जागीच ठार झाले.
खानापूर पोलिसात घटनेची नोंद झाली असून शवविच्छेदन करून शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मारुती यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले आहेत. एक मुलगा परदेशात असून, दुसरा मुलगा सैन्यात आहे. तर तिसरा मुलगा शेती करतो.