Tarun Bharat

शिरवळ येथे विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू

Advertisements

प्रतिनिधी/अक्कलकोट

अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ येथे शेतातील बांधावर पडलेल्या तारेचा शॉक लागून एकाचा जागीच मृत्यू झाला. नूरदिन मौला दखणे (वय ५५) रा. शिरवळ ता अक्कलकोट असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, शनिवार दि. २३ रोजी सकाळी ९ च्या सुमारास नूरदिन मौला दखणे हे शेतातील कामे उरकून बांधावरून घरी येत असताना एमएसईबीच्या तुटलेल्या तारेचा शॉक लागून नूरदिन यांच्या छातीला भाजून मोठी दुखापत झाली. विजेचा धक्का जोरात बसल्याने जागेवरच कोसळले. याबाबतची तक्रार मुलगा मैनोदीन याने पोलीस ठाण्यात दिली व त्यानंतर गावातील लोकांच्या मदतीने मयत वडिलांना खाजगी वाहनाने अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करून तपासणी केली असता उपचारापूर्वीच नूरदिन यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. त्यांच्या पश्चात तीन मुले व मुलगी असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सुरवसे करीत आहेत.

Related Stories

सोलापूर शहरात १५३ पॉझिटिव्ह ; उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू

Abhijeet Shinde

उद्यापासून 15 मार्गांवर रेल्वे धावणार

Abhijeet Shinde

सोलापूर : प्रियसीच्या ञासाला कंटाळून प्रियकराची आत्महत्या

Abhijeet Shinde

मोदी सरकार व जिल्हा प्रशासनास कांदा, भाजीपाला भेट देऊन केले अनोखे आंदोलन

Abhijeet Shinde

सोशल मिडीयाच्या आहारी जावून खून केल्याची कबुली

Sumit Tambekar

शिवसेना अन् आरएसएसच्या हिंदुत्वामध्ये फरक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!