वाई/प्रतिनिधी
वाई येथील कृष्णा नदीच्या पात्रात राम डोहात एक योवक बुडाला आहे .सोमवारी सकाळी काही युवक पोहायला गेले होते. दहा वाजण्याच्या सुमारास त्यातील एक जण पोहता पोहता बुडाल्याचे इतर मित्रांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अपयश आले .त्यांनी ही घटना स्थानिक व पोलिसांना कळविली असता पोलीस घटनास्थळी पोहचले असून पोलिसांनी शोध मोहिम राबवण्याकरता रेस्क्यू टीमला बोलवण्यात आले असल्याचे समजते. बुडालेल्या युवकाचे नाव विकास सदाशिव वैराट असे असल्याचे स्थानिकाने सांगितले आहे. सध्या रामडोहात शोध कार्य सुरू आहे.