प्रतिनिधी/संगमेश्वर
संगमेश्वर तालुक्यातील मांजरे जंगलदेव वाडी येथे सायंकाळी 7.30 च्या सुमारास ओमकार सुरेंद्र देसाई (30) याच्याकडून विनापरवाना वापरलेली ठासण्याची बंदूक आणि काडतुसे जप्त करण्यात आलेले आहेत.
ओमकार सुरेंद्र देसाई वय 30 याला याच्याकडे रायफलींची जीवंत काडतुसे विनापरवाना बाळगल्या प्रकरणी रत्नागिरीचे दहशतवादी पथक यांनी कारवाई करून ओमकार सुरेंद्र देसाई याला अटक केली त्यावेळी उपनिरीक्षक विखे नरवणे सोबत पोलीस कॉन्स्टेबल विजय तांदळे भुजबळराव महेश गुरव पोलीस चालक कदम उपस्थित होते. या प्रकरणी अधिक तपास संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल संतोष झापडेकर करत आहेत