Tarun Bharat

वनप्लस 10 टी स्मार्टफोन भारतीय बाजारात दाखल

Advertisements

19 मिनिटात होणार फुल चार्ज : सवलतीच्या दरात फोन मिळणार असल्याचे संकेत

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

वनप्लसने आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन वनप्लस 10 टी भारतासह जागतिक बाजारात सादर केला आहे. वनप्लस 10 टी हा सर्वात लोकप्रिय हॅण्डसेट आहे. ज्यामध्ये स्नॅपड्रगन 8प्लस जेन 1 प्रोसेसर उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. सदरच्या उपकरणास पॉवर देण्यासाठी 4800 एमएएच क्षमतेची बॅटरी उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनीने यावेळी दिली आहे. यात 150 डब्लूच्या सुपर वूक चार्जिंगची सोय असणार आहे.

फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअपसोबत उपलब्ध होणार असून याचे डिझाइन वनप्लस 10 प्रो सारखे आहे. यामध्ये 16 जीबी पर्यंत रॅम व 265 जीबी पर्यंतचे स्टोरेज उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.

वनप्लसची सुरुवातीची किमत ही 49,999 रुपये असून यामध्ये मॉडेलनुसार किमती वेगवेगळय़ा आहेत. 54,999 व टॉप मॉडेलची किंमत ही 55,999 रुपये इतकी राहणार असल्याची माहिती आहे.

फिचर्स

  • 6.7 इंच पूर्ण एचडीसह रिझोल्यूशन असणारा एटीपीओ2 10 बिट अमोलेड डिस्प्ले
  • स्क्रीन 120 एचझेड रिप्रेश रेट सपोर्ट करणार
  • स्नॅपड्रगन 8 प्लस जेन 1 प्रोसेसरसह येणार
  • 16जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज प्राप्त होणार
  • कनेक्टिविटी पर्यायांमध्ये 5-जी, 4-जी एलटीई, वायफाय6, ब्लूटय़ूथ 5.3, जीपीएस, ए-जीपीएस, एनएफसी आणि यूएसबी टाईप सी पोर्टचा समावेश आहे. सेंसरमध्ये एक्सेलेरोमीटर, एंबियंट लाइट, जायरोस्कोप, मॅग्नेटोमीटर व प्रॉक्सिमिटी सेंसर 

Related Stories

देशातील पहिला 5 जी स्मार्टफोन 24 फेब्रुवारीला होणार सादर

tarunbharat

मायक्रोसॉफ्टचे तेलंगणात मोठे डाटा केंद्र

Amit Kulkarni

पोकोचा स्मार्टफोन लाँचिंग कार्यक्रम

Amit Kulkarni

आता गुगलचं टँगी ऍप

Omkar B

‘वन प्लस’ची भारतीय बाजारावर नजर

Patil_p

ऍपल आयफोन 12 ची किंमत

Patil_p
error: Content is protected !!