नवी दिल्ली : वन प्लस 11 5जी स्मार्टफोन भारतामध्ये 7 फेब्रुवारी 2023 रोजी लॉन्च होणार असल्याची माहिती आहे. 16 जीबी रॅमसह 512 जीबी स्टोरेजची व्यवस्था या फोनमध्ये उपलब्ध असणार आहे. वन प्लसने याआधी वन प्लस 10 प्रो स्मार्टफोन सादर केला होता. आता कंपनी नवा वन प्लस 11 5 जी फोन पहिल्यांदा चीनमध्ये लॉन्च करणार आहे. यानंतर हा फोन भारत व इतर देशांमध्ये टप्प्याटप्प्याने लॉन्च केला जाणार आहे. कंपनीचा वन प्लस 10 प्रो स्मार्टफोन चीनमध्ये जानेवारी 2022 मध्ये लॉन्च केला होता. त्यानंतर मार्च 2022 मध्ये भारतीय बाजारामध्ये या फोनचे लाँचिंग करण्यात आले होते. या फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रगन 8 जनरेशन 2 हा प्रोसेसर मिळणार असून हँडसेटमध्ये 16 जीबी रॅम व 512 जीबी स्टोरेजची सोय आहे. सदरचा स्मार्टफोन हा काळा व हिरवा या दोन रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. साधारण हा फोन वन प्लस 10 प्रो सारखाच असेल असेही बोलले जात आहे. परंतु मागच्या तुलनेमध्ये या फोनची जाडी जरा कमीच असेल असेही सांगितले जात आहे.


previous post
next post