मागच्या वर्षी 1 कोटीपेक्षा जास्त स्मार्टफोन्स भारतामध्ये निर्यात ः स्मार्टफोन्सचा वाटा 19 टक्के इतका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जागतिक स्मार्टफोन ब्रँडमध्ये लोकप्रियता प्राप्त करणाऱया वन प्लस कंपनीने आता भारतामध्ये आपले व्यवसायाचे जाळे अधिक विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्ष 2021 मध्ये जवळपास 1 कोटी 10 लाख इतके स्मार्टफोन्स वन प्लसने भारतामध्ये निर्यात केले होते. याचाच अर्थ भारतीयांनी कंपनीवर आपले प्रेम व्यक्त केले आहे, हे उघड आहे.
भारतामध्ये कंपनीच्या स्मार्टफोन्सना लोकप्रियता लाभत असून हे पाहता कंपनी भारतामध्ये आपल्या व्यवसायाची पाळेमुळे अधिक घट्ट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. चांगल्या तंत्रज्ञानाच्या स्मार्टफोनमुळे कंपनीची लोकप्रियता भारतामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. वन प्लसने 10 प्रो 5 जी स्मार्टफोन ‘मेक इन इंडिया’ आधारित तयार केला आहे.
मेड इन इंडिया-मोबाइलसोबत टीव्हीही
फेब्रुवारी 2018 मध्ये सदरच्या ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत फोन निर्मितीला भारतामध्ये सुरुवात करण्यात आल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. मध्यम-प्रीमियम गटातील स्मार्टफोनच्या निर्मितीबरोबरच वन प्लसने आता टीव्हीची निर्मितीही भारतामध्ये करायला सुरुवात केली आहे. या येथेच तयार दोन्ही वस्तूंची विक्री करण्यासाठी भारतात चांगली संधी कंपनीला प्राप्त झाली आहे. भारताचे वन प्लस इंडियाचे प्रमुख व सीईओ नवनीत नाक्रा यांनी वरील माहिती दिली आहे.
10 प्रो स्मार्टफोनची जादू कायम
वन प्लस 10 प्रो या स्मार्टफोनने भारतामध्ये चांगलीच लोकप्रियता सिद्ध केली आहे. स्मार्टफोनची बांधणी, तंत्रज्ञान, डिझाइन व दर्जा या साऱयाच गोष्टी ग्राहकांना पसंत पडल्या आहेत. तसेच इतर अनेक वैशिष्टय़े ह्यामध्ये असल्याने लोकप्रियता अधिकाधिक वाढताना दिसते आहे. या लोकप्रियतेचा फायदा कंपनीने उठवला असून देशामध्ये आपले जाळे विणण्याचा निर्णय घेतला आहे. फोटोग्राफीचा शौक असणाऱयानाही वन प्लस 10 प्रो हा अधिक किफायतशीर ठरला आहे. दमदार 5000 एमएएच बॅटरी याला असून इतरही अनेक वैशिष्टय़े या फोनमध्ये दिली गेली आहेत. प्रीमियम गटातील स्मार्टफोनच्या किमती या 30 हजार ते 35 हजार इतक्मया आहेत. भारतात 5 जी स्मार्टफोनमध्ये 19 टक्के इतका वाटा कंपनीने राखला आहे.