शिवसेनेचे मडगाव पालिका मुख्याधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /मडगाव
मडगावातील पालिका इमारतीच्या मागे असलेल्या डेव्हिड हाऊस इमारतीची बेकायदेशीररीत्या दुरुस्ती करण्यात येत असल्याचा दावा शिवसेनेतर्फे करण्यात आला असून यासंदर्भात मडगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱयांना त्यांच्याकडून निवेदन देण्यात आले आहे. त्यात यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी केली आहे. सदर इमारत ही 50 ते 60 वर्षे जुनी असून धोकादायक असल्याचा दावा शिवसेनेचे शाखा विस्तार समिती प्रमुख राजू विर्डीकर यांनी निवेदनातून केला आहे. पावसाळय़ात या ठिकाणी पाणी भरून राहत असल्याचे व वरच्या बाजूने बेकायदेशीररीत्या शेड उभारली असल्याचे मुख्याधिकाऱयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.