टोमॅटो-बिन्स दरात वाढ : इतर भाजीपाला दर स्थिर : पावसामुळे बटाटा काढणी ठप्प
वार्ताहर /अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार पेठेमध्ये शनिवारच्या बाजारात कांद्याचा आणि जवारी बटाटय़ाचा भाव प्रति क्विंटल 200 रुपयांनी वाढला आहे. इंदोर, आग्रा बटाटय़ाचा भाव स्थिर आहे. भाजी मार्केटमध्ये टोमॅटो आणि बिन्सचा भाव वाढला असून इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर आहेत.
गेल्या आठवडाभरापासून दररोज वळीव पाऊस पडत असल्यामुळे तालुक्यामध्ये जवारी बटाटा काढणी व भरणी ठप्प झाली आहे. यामुळे जवारी बटाटय़ाचा भाव प्रतिक्विंटल 200 रुपयांनी वाढला आहे.
कांद्याचा भाव दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱयांनी बाजारात कमी आणला होता. मात्र, आवक कमी झाल्यामुळे कांद्याचा भाव प्रतिक्विंटल 200 रुपयांनी वाढला आहे. शनिवारी बाजारात कांदा सुमारे 50 ट्रक, इंदोर बटाटा पाच ट्रक, आग्रा बटाटा दोन ट्रक व जवारी बटाटय़ाच्या सुमारे 2500 पिशव्या आवक झाल्याची माहिती अडत व्यापारी कल्लाप्पा गडकरी यांनी दिली.
जवारी बटाटा भाव प्रति क्विंटल
- गोळी………….. 300 ते 400 रु.
- मीडियम……. 1000 ते 1500 रु.
- मोठवड…….. 1500 ते 1700 रु.
- गोळा………. 1800 ते 2000 रु.
- इंदोर बटाटा… 1800 ते 2000 रु.
- आग्रा बटाटा… 1800 ते 1900 रु.
लाल कांदा प्रति क्विंटल
- गोळी………….. 500 ते 800 रु.
- मीडियम……… 900 ते 1100 रु.
- मोठवड…….. 1100 ते 1200 रु.
- गोळा………. 1200 ते 1300 रु.
- पांढरा 500 ते 1200 रु.
भाजीपाला शेकडा भाव
- मेथी………… 1000 ते 1400 रु.
- शेपू……………. 600 ते 800 रु.
- पालक…………. 300 ते 500 रु.
- कांदापात………. 200 ते 400 रु.
- लाल भाजी…….. 400 ते 500 रु.
- घटप्रभा कोथिंबीर 1000 ते 1200 रु.
- बेळगाव कोथिंबीर 600 ते 1000 रु.
भाजीपाला प्रति दहा किलो
- ढबू मिरची…….. 350 ते 400 रु.
- बिन्स………….. 500 ते 800 रु.
- कारली………… 250 ते 300 रु.
- बेळगाव वांगी…. 200 ते 250 रु.
- दोडकी…………. 280 ते 320 रु.
- कोबी……………… 30 ते 60 रु.
- इंग्लीश गाजर….. 200 ते 220 रु.
- भेंडी…………… 200 ते 280 रु.
- बिट………………. 30 ते 80 रु.
- जवारी काकडी…. 200 ते 280 रु.
- आले…………… 280 ते 300 रु.
- मटार………… 800 ते 1000 रु.
- टोमॅटो प्रति ट्रे….. 400 ते 600 रु.
- हिरवी मिरची…. 500 ते 600 रु.
- जी फोर मिरची… 600 ते 700 रु.
- बटका मिरची….. 700 ते 750 रु.
- इंदोर ढबू मिरची. 300 ते 350 रु.
- मालिनी पांढरी काकडी 180 ते 220 रु.
- दुधी भोपळा प्रति डझन 180 ते 220 रु.
- गोल भोपळा प्रतिक्विं.1200 ते 1500 रु.