Tarun Bharat

कांदा-बटाटा दरात प्रतिक्विंटल 200 रुपयांनी वाढ

Advertisements

रताळय़ाच्या दरात घसरण : मिरची, बिन्स, वांगी आदी भाजीपाल्याचे दर भडकले : आंतरराष्ट्रीय बाजारात कांदा दरवाढीचाही परिणाम

सुधीर गडकरी /अगसगे

बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात कांदा-बटाटा दर प्रतिक्विंटल 200 रुपयांनी वाढला आहे. रताळय़ाच्या दरात घसरण झाली आहे. भाजीमार्केटमध्ये मिरची, बिन्स, वांगी आदी भाजीपाल्याचे दर भडकले असून इतर काही भाजीपाल्याचे दर स्थिर आहेत. कांदा-बटाटासह इतर भाजीपाल्याचे दर  यंदा भडकत चालल्याने सर्वसामान्य जनतेचे आर्थिक बजेट कोलमडत चालले आहे. यामुळे भाकरीवरची भाजीच गायब होत आहे.

गुरुवारपासून घटप्रभा, बैलहोंगल, गोकाक, बेळगाव तालुक्यांमध्ये दमदार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतामध्ये पाणी तुंबून भाजीपाला खराब झाला आहे. शेतामध्ये चिखल झाल्याने भाजीपाला काढणी थांबली आहे. यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली होती. यामध्ये काही भाजीपाल्याची म्हणजे मिरची, मेथी, बिन्स, वांगी यांची आवक कमी झाली. यामुळे दर भडकले आणि इतर काही भाज्यांचे दर थोडय़ा प्रमाणात वाढले आहेत. भाजीपाल्याला बेळगावसह गोवा, कोकणपट्टा, सिंधुदुर्ग आदी ठिकाणाहून मागणी रोजच्याप्रमाणे आहे, अशी माहिती भाजी व्यापारी भैरू कंग्राळकर यांनी दिली.

दुबई, मलेशिया, इंडोनेशिया, श्रीलंका, बांगलादेश व अरब राष्ट्रांकडून भारतातील कांद्याला मागणी वाढली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचा भाव वाढला आहे. महाराष्ट्रातील नाशिक बाजारात आणि दिल्ली-आझादपूर बाजारातही कांदा दरात वाढ होण्यास प्रारंभ झाला आहे. यामुळे बुधवारी बेळगाव मार्केटयार्डमध्ये कांदा दर 1200 ते 2500 रु. प्रतिक्विंटल झाला होता. यामुळे शेतकरी आणि तेजी-मंदी करणारे व्यापारी यांनी जमा करून ठेवलेला जुना कांदा विक्रीसाठी पाठविल्याने शनिवारी बाजारात सुमारे 80 ट्रक कांदा आला होता. यामुळे कांदा दरात मंदी आली. मात्र, मागील शनिवारच्या भावाच्या तुलनेत दरात 200 रुपयांनी वाढ झाली.

शनिवारच्या बाजारात महाराष्ट्रातून 25 ट्रक, कर्नाटक जुना कांदा 15 ट्रक आणि कर्नाटक नवीन कांदा 40 ट्रक अशी एकूण 80 ट्रक आवक होती. इंदूर बटाटय़ाच्या 5 ट्रक व आग्रा 2 ट्रक, जवारी बटाटय़ाच्या 4 हजार पिशव्या आवक, रताळय़ाच्या 5 हजार पिशव्या आवक झाल्याची माहिती अडत व्यापारी बसवंत मायाण्णाचे यांनी दिली.

बटाटा-रताळय़ाला अधिक मागणी

सध्या तालुक्याच्या पूर्व-पश्चिम परिसरातील मसार आणि लाल जमिनीतील बटाटा आणि रताळी काढणीला प्रारंभ झाला आहे. हा बटाटा आणि रताळी पंजाब, हरियाणा, पुणे, दिल्ली, मुंबई, ललितपूर आदी ठिकाणी निर्यात होत आहेत. सध्या नवरात्र असल्याने उपवासाचा आहार म्हणून रताळय़ाला मागणी आहे. जवारी बटाटा खाण्यासाठी स्वादिष्ट असतो आणि वेफर्स बनविण्यासाठी इतर राज्यांमधून बटाटा मागविण्यात येतो. यामुळे जवारी बटाटय़ाला मागणी आहे, अशी माहिती अडत व्यापारी अशोक बामणे यांनी दिली.

उत्पादनात घट

यंदा मुसळधार पावसामुळे बटाटा पीक खराब झाले आहे. त्यातच रोग पडल्याने बटाटय़ाच्या झाडांची वाढ खुंटली होती. बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील बहुतांश शेतकरी यंदा बटाटा लागवडीकडे न वळता रताळी आणि भुईमूग, सोयाबिन लागवडीकडे वळले आहेत. कारण या पिकांना उत्पादनासाठी खर्च कमी येतो आणि नफा अधिक प्रमाणात मिळतो. बटाटा पिकाला खत, औषधे व लागवडीसाठीच्या बियाणांचा खर्च मोठा असतो आणि उत्पादनात दरवर्षी घट होत आहे. यामुळे बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील शेतकऱयांनी बटाटा लागवड यंदा कमी केली आहे. मात्र पावसामुळे लागवड केलेली पिके वाया जावून उत्पादनात घट होत आहे, अशी माहिती शेतकरी बाळू हंडेन्नवर यांनी दिली.

भाजीपाल्याचे दर चढेच : पावसाचा परिणाम, आवक मंदावली

अतिपावसामुळे भाजीपाला पिकाला फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होऊन आवक कमी झाली आहे. परिणामी भाज्यांचे दर आवाक्मयाबाहेर गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना भाजीपाला खरेदी करणे कठीण झाले आहे. मागील महिन्याभरापासून भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. विशेषतः पालेभाज्यांचे दर भडकले आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक यासह गृहिणींच्या बजेटवर मोठा परिणाम झाला आहे.

शनिवारच्या आठवडी बाजारात भाजीचा प्रतिकिलोचा दर- काकडी 60 रु.,  बटाटा 30 रु., ढबू 80 रु., गाजर 60 रु., टोमॅटो 40 रु., बिन्स 60 रु., ओली मिरची 80 रु., वांगी 60 रु., भेंडी 60 रु., गवार 60 रु., दोडकी 60 रु., कारली 60 रु., कांदे 20 रु., शेवग्याच्या पेंडीचा दर 20 रु., मेथी 20 रु., पालक 20 रुपयांना दोन, शेपू 20 रु., कांदापात 20 रुपयांना चार पेंडय़ा तर कोबी 30 रु. नग, फ्लॉवर 20 रुपये नग असा दर आहे.

अतिपावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवारात पाणी साचून भाजीपाला पिकाला फटका बसला आहे. त्यामुळे भाज्यांचे उत्पादन कमी होऊन दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना भाजीपाला खरेदी करणे मुश्कील झाले आहे. आधीच महागाईच्या कचाटय़ात सापडलेल्या जनतेला वाढत्या भाजीपाला दराचा चटका सहन करावा लागत आहे. आवक मंदावल्याने मागील काही दिवसांपासून मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर चढेच असलेले पाहायला मिळत आहेत.

खाद्यतेलाच्या दरात घसरण

रशिया-युपेन युद्धादरम्यान खाद्यतेलांच्या किमती भरमसाट वाढल्या होत्या. त्यामुळे सर्वसामान्यांना खाद्यतेल खरेदी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, आता काही दिवसांपासून खाद्यतेलांच्या किमती कमी होत आहेत. 200 रुपये किलो झालेले खाद्यतेल आता 150 रुपयांवर येऊन ठेपले आहे. शिवाय सनफ्लॉवर खाद्यतेलाच्या किमतीत किलोमागे 10 रुपयांची घट झाली आहे.

भाजीपाला शेकडा भाव

 • घटप्रभा मेथी….. 2000 ते 2200 रु.
 • बेळगाव मेथी…. 1500 ते 1600 रु.
 • घटप्रभा कोथिंबीर 2000 ते 2500 रु.
 • हायब्रिड कोथिंबीर 1200 ते 1500 रु.
 • शेपू ……………. 1000 ते 1200 रु.
 • पालक ……………. 400 ते 500 रु.
 • लालभाजी ……… 800 ते 1000 रु.
 • स्वीटकॉर्न बेळगाव 800 ते 1100 रु.
 • स्वीटकॉर्न घटप्रभा 1100 ते 1200 रु.
 • नवलकोल ……….. 500 ते 550 रु.
 • कांदापात…………. 550 ते 600 रु.

भाजीपाला प्रति दहा किलो

 • गवार …………….. 350 ते 400 रु.
 • बिट ………………. 400 ते 450 रु.
 • इंदस ढबू मिरची … 500 ते 600 रु.
 • इंदिरा ढबू मिरची . 750 ते 800 रु.
 • रिंग बिन्स ……….. 600 ते 650 रु.
 • नाशिक बिन्स ……. 600 ते 660 रु.
 • मखमली बिन्स …… 620 ते 650 रु.
 • बेंगळूर बिन्स ……. 620 ते 660 रु.
 • कारली …………… 500 ते 550 रु.
 • पांढरी कारली …… 300 ते 400 रु.
 • वांगी …………….. 500 ते 520 रु.
 • बोळगी वांगी ……. 300 ते 350 रु.
 • काटी वांगी ………. 450 ते 500 रु.
 • भेंडी ……………… 400 ते 450 रु.
 • जी फोर मिरची …. 700 ते 800 रु.
 • पांढरी मिरची …… 350 ते 450 रु.
 • काळी मिरची ……. 450 ते 500 रु.
 • बटका मिरची ……. 600 ते 650 रु.
 • दुधी भोपळा प्रतिडझन 300 ते 400 रु.
 • गोल भोपळा प्रतिक्विंटल 2800 ते 3000 रु.
 • कोबी पोते………… 240 ते 250 रु.
 • फ्लॉवर एक डझन.. 450 ते 500 रु.
 • नवीन आले……….. 300 ते 320 रु.
 • जुने आले………….. 600 ते 650 रु.
 • टोमॅटो प्रति ट्रे…….. 700 ते 800 रु.

महाराष्ट्र कांदा प्रतिक्विंटल

 • गोळी………….. 1200 ते 1400 रु.
 • मीडियम………. 1400 ते 1700 रु.
 • मोठवड……….. 1700 ते 1900 रु.
 • गोळा………….. 1900 ते 2200 रु.

जुना कर्नाटक कांदा प्रतिक्विंटल

 • गोळी……………. 800 ते 1200 रु.
 • मीडियम………. 1200 ते 1500 रु.
 • मोठवड……….. 1500 ते 1800 रु.
 • गोळा………….. 1800 ते 1900 रु.
 • इंदूर बटाटा ….. 2400 ते 2600 रु.
 • आग्रा बटाटा …. 2200 ते 2400 रु.
 • रताळी ……….  1100 ते 1400 रु.

जवारी बटाटा प्रतिक्विंटल

 • गोळी …………….. 700 ते 800 रु.
 • मीडियम ……… 1500 ते 1800 रु.
 • मोठवड ………  2000 ते 2300 रु.
 • गोळा …………  2300 ते 2500 रु.

कर्नाटक नवीन कांदा प्रतिक्विंटल

 • गोळी …………….  300 ते 600 रु.
 • मीडियम ……….  800 ते 1200 रु.
 • मोठवड ………  1200 ते 1300 रु.
 • गोळा      1300 ते 1500 रु.

Related Stories

रुद्राक्ष विक्री-भव्य प्रदर्शन

Patil_p

नुपूर शर्मा-नवीन जिंदाल यांच्यावर कारवाई करा

Amit Kulkarni

कर्नाटक: आरोग्य विभागाच्या कार्यालयातील वाहन चालकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

कर्नाटकात आलेल्या 57 विदेशी तबलिगींची नावे काळय़ायादीत?

Patil_p

लाळय़ा खुरकतने पशुपालकांच्या अर्थकारणावर परिणाम

Amit Kulkarni

रत्नागिरी जिल्हा सोमवारी ‘कोरोना शून्य’

Patil_p
error: Content is protected !!