Tarun Bharat

एपीएमसी बाजारात कांदा-बटाटा दर स्थिर

Advertisements

कमी आवकेमुळे भाजीपाला दरात वाढ

वार्ताहर /अगसगे

बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात कांदा-बटाटा दर प्रतिक्विंटल स्थिर आहेत. भाजी मार्केटमध्ये काही भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत, तर काही भाजीपाल्यांचे दर मात्र स्थिर आहेत.

सध्या इंदूर, आग्रा या ठिकाणाहून शीतगृहांमधील बटाटा बेळगाव एपीएमसीला विक्रीसाठी येत आहे. सध्या मुसळधार पावसामुळे गोवा, कोकणातून होणारी मागणी मंदावली आहे. परराज्यांतून येणारी बटाटय़ांची आवकही कमी झाली आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकातील आवक पावसामुळे कमी प्रमाणात येत आहे. सध्या कांद्याला देशभरात मागणी कमी आहे. बांगलादेश आणि इतर देशांमध्ये निर्यात होणारा कांदा केंद्र सरकारच्या काही अटींमुळे थांबला आहे. यामुळे यंदा कांद्याचा भाव वाढला नाही. इतर देशांमध्ये कांदा निर्यातीला सुरुवात झाल्यास कांद्याचा भाव वाढणार असल्याची माहिती अडत व्यापाऱयांनी दिली.

संततधार पावसामुळे शेतात पाणी तुंबल्याने भाजीपाला खराब झाला आहे. यामुळे काही भाजीपाल्यांचे भाव वाढले आहेत. इतर भाजीपाला बेळगाव जिल्हा परिसरातून येत आहे. कच्चा भाजीपाला पावसाळय़ामध्ये नागरिक कमी प्रमाणात खरेदी करतात. यामुळे इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर आहेत. इंग्लिश गाजर तुमकूरमधून मागविण्यात येत आहे.

भाजीपाला शेकडा भाव

 • मेथी………… 1000 ते 1200 रु.
 • घटप्रभा कोथिंबीर 800 ते 1000 रु.
 • बेळगाव कोथिंबीर 600 ते 800 रु.
 • चायना कोथिंबीर. 300 ते 500 रु.
 • शेपू……………. 500 ते 600 रु.
 • पालक…………. 250 ते 300 रु.
 • कांदापात………. 300 ते 400 रु.
 • लाल भाजी…….. 500 ते 600 रु.
 • इंदूर बटाटा…………2000 ते 2300 रु.
 • आग्रा बटाटा……….2000 ते 2100 रु.

महाराष्ट्र कांदा प्रति क्विंटल

 • गोळी………… 800 ते 1200 रु.
 • मीडियम……. 1200 ते 1600 रु.
 • मोठवड…….. 1700 ते 2000 रु.
 • गोळा………. 2000 ते 2200 रु.

कर्नाटक कांदा प्रति क्विंटल

 • गोळी………… 600 ते 1000 रु.
 • मीडियम……. 1000 ते 1500 रु.
 • मोठवड…….. 1500 ते 1700 रु.
 • गोळा………. 1900 ते 2000 रु.

भाजीपाला प्रती दहा किलो भाव

 • ढबू मिरची…….. 400 ते 450 रु.
 • इंडस ढबू मिरची.. 350 ते 400 रु.
 • बिन्स………….. 700 ते 800 रु.
 • कारली………… 220 ते 250 रु.
 • वांगी………….. 180 ते 200 रु.
 • काटा वांगी…….. 200 ते 250 रु.
 • बिळगी वांगी….. 150 ते 180 रु.
 • दोडकी…………. 350 ते 400 रु.
 • कोबी……………. 80 ते 100 रु.
 • इंग्लिश गाजर….. 450 ते 500 रु.
 • भेंडी…………… 280 ते 300 रु.
 • बिट……………. 300 ते 340 रु.
 • जवारी काकडी…. 250 ते 300 रु.
 • आले…………… 400 ते 450 रु.
 • हिरवी मिरची…. 300 ते 350 रु.
 • पांढरी मिरची….. 250 ते 300 रु.
 • तुकडा मिरची….. 250 ते 300 रु.
 • काळी मिरची….. 330 ते 370 रु.
 • बटका मिरची….. 250 ते 300 रु.
 • दुधी भोपळा प्रति डझन 150 ते 200 रु.
 • गोल भोपळा प्रति क्विं. 900 ते 1000 रु.
 • टोमॅटो प्रति टे….. 300 ते 450 रु.

Related Stories

एआरटीओला चार वर्षांचा कारावास

Amit Kulkarni

जायंट्स सखीतर्फे एड्सबाधित मुलांना औषधे-कपडय़ांचे वाटप

Patil_p

वनवासमाचीच्या 11 जणांसह 12 जणांना डिस्चार्ज

Patil_p

लॉकडाऊन काळातील पालकत्व हे एक आव्हान

Patil_p

शहराचे अर्थचक्र पुन्हा गतिमान

Amit Kulkarni

मंगळवारी 47 जण कोरोनामुक्त तर 30 जणांना लागण

Patil_p
error: Content is protected !!