बटाटा दर प्रतिक्विंटल 200 रुपयांनी वाढला : भाजीपाल्याचे दरही वाढलेलेच
वार्ताहर /अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारच्या बाजारात कांद्याचा भाव प्रती क्विंटल 200 रुपयांनी कमी झाला आहे. बटाटा दर क्विंटलला 200 रुपयांनी वाढला आहे. भाजीमार्केटमध्ये मोजक्या भाजीपाल्यांचा भाव स्थिर आहे. मात्र, इतर भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत. टोमॅटो भाव मात्र घसरला आहे.
यंदाच्या हंगामात बेळगाव तालुक्यामध्ये बटाटा लागवड कमी प्रमाणात झाली आहे. अतिवृष्टीमुळे हासन जिल्हय़ामध्ये बटाटा लागवड खराब झाली आहे. यामुळे इंदोरमधून बेळगावला बटाटा पुरवठा करणारे व्यापारी पुढील काही दिवसांमध्ये बटाटा दर वाढण्याची शक्यता वर्तवित आहेत. यामुळे शीतगृहांमधील इंदोर बटाटा इतर राज्यांमध्ये कमी प्रमाणात विक्रीसाठी पाठवत आहेत. तेही हमीभाव मिळत असलेल्या ठिकाणीच आपला बटाटा माल विक्रीसाठी पाठवत आहेत. यामुळे शनिवारी बटाटा दरात चांगल्या प्रतीच्या बटाटा भावात प्रतिक्विंटलला 200 रुपयांनी वाढ झाल्याची माहिती अडत व्यापाऱयांनी दिली.
बांगला देश, श्रीलंका यासह इतर काही देशांमध्ये भारतातून निर्यात होणारा कांदा केंद्र सरकारच्या काही अटींमुळे बंद झाला आहे. दुबईसह अन्य ठिकाणी भारतातून कांदा निर्यात होत आहे. यामुळे भारतात कांद्याचा मोठा साठा शिल्लक आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी पंढरपूर वारी संपवून आल्याने आपल्याकडील साठवून ठेवलेला कांदा विक्रीसाठी काढत आहेत. कर्नाटकातील जुना कांदा विक्रीसाठी बेळगाव बाजारात येत आहे.
खरेदीदार कमी आल्याने शनिवारच्या बाजारात लिलावामध्ये याचा परिणाम होऊन कांद्याचा भाव प्रतिक्विंटल 200 रुपये कमी झाल्याची माहिती अडत दुकानदारांनी दिली.
पावसाच्या अतिवृष्टीमुळे बेळगाव जिल्हय़ामधील भाजीपाला खराब झाला आहे. यामुळे भाजीपाल्याचा भाव वाढला आहे. बिन्ससह काही भाजीपला बेंगळूरहून येत आहे. इंग्लिश गाजर तुमकुरहून बेळगावला येत आहे. टोमॅटोचे उत्पादन वाढले आहे. यामुळे टोमॅटोचा दर घसरला आहे, अशी माहिती भाजी व्यापाऱयांनी दिली.
भाजीपाला शेकडा भाव
- मेथी…………… 600 ते 700 रु.
- घटप्रभा कोथिंबीर 1000 ते 1500 रु.
- बेळगाव कोथिंबीर 600 ते 1000 रु.
- चायना कोथिंबीर. 600 ते 800 रु.
- शेपू ……………. 500 ते 800 रु.
- पालक…………. 300 ते 500 रु.
- कांदापात………. 400 ते 500 रु.
- लालभाजी 400 ते 500 रु.
- दुधी भोपळा प्रति डझन 300 ते 450 रु.
- गोल भोपळा प्रति क्विं.1100 ते 1200 रु.
- टोमॅटो प्रति ट्रे 150 ते 250 रु.
भाजीपाला भाव प्रति दहा किलो
- हिरवी मिरची 200 ते 250 रु.
- जी फोर मिरची… 250 ते 350 रु.
- पांढरी मिरची …. 200 ते 250 रु.
- तुकडा मिरची …. 100 ते 180 रु.
- काळी मिरची….. 330 ते 350 रु.
- बटका मिरची….. 200 ते 300 रु.
- ढबू मिरची…….. 450 ते 600 रु.
- इंदस ढबू मिरची . 400 ते 500 रु.
- बिन्स ………….. 500 ते 600 रु.
- बेंगळूर बिन्स…… 600 ते 700 रु.
- कारली………… 300 ते 400 रु.
- वांगी………….. 200 ते 250 रु.
- काटी वांगी…….. 250 ते 300 रु.
- बोळगी वांगी….. 150 ते 200 रु.
- दोडकी…………. 350 ते 500 रु.
- कोबी …………. 100 ते 180 रु.
- इंग्लिश गाजर….. 380 ते 420 रु.
- भेंडी…………… 350 ते 450 रु.
- बिट …………… 180 ते 240 रु.
- जवारी काकडी … 250 ते 300 रु.
- आले…………… 400 ते 450 रु.