Tarun Bharat

ऑनलाईनमुळे पासपोर्ट काढणे झाले सुलभ

बेळगाव पासपोर्ट कार्यालयात अवघ्या सहा महिन्यांत 6 हजार नागरिकांची पासपोर्टसाठी अर्ज पडताळणी

सुशांत कुरंगी /बेळगाव

पासपोर्ट काढणे ही ऑनलाईन प्रक्रिया झाल्यामुळे पासपोर्ट काढणे अधिक सोयीचे झाले आहे. त्यातच बेळगावमध्ये सुरू करण्यात आलेल्या पासपोर्ट सेवा केंद्रामुळे बेळगावमध्येच कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. पासपोर्ट काढणे ही किचकट प्रक्रिया ऑनलाईनमुळे सुलभ झाली आहे. त्यामुळेच बेळगाव पासपोर्ट कार्यालयात अवघ्या सहा महिन्यांत 6 हजार नागरिकांनी पासपोर्टसाठी अर्ज पडताळणी करून घेतली आहे.

पूर्वी बेळगावमध्ये पासपोर्ट कार्यालय नसल्याने हुबळी येथे जाऊन पासपोर्टसाठी कागदपत्रांची पडताळणी करावी लागत होती. पोस्ट कार्यालयाच्या सहकार्याने बेळगाव जिल्हय़ात बेळगाव शहर व चिकोडी येथे 2 पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात आली. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांच्या परिश्रमामुळे बेळगावमध्ये पासपोर्ट कार्यालय सुरू होऊ शकले. परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर एक दाखला म्हणून सध्या पासपोर्टचा वापर केला जात आहे. परराष्ट्र मंत्रालयातर्फे पासपोर्ट दिला जातो.

पासपोर्ट सेवाकेंद्राच्या वेबसाईटला जाऊन अर्ज करावयाचा असतो. ज्यांना अर्ज करणे माहिती आहे ती व्यक्ती अर्ज करू शकते. अथवा सायबर कॅफेमध्ये जाऊनही अर्ज करता येतो. अर्जामध्ये दिलेली माहिती भरल्यानंतर 500 रुपयांचे ऑनलाईन पेमेंट करावे लागते. त्यानंतर अपॉईंटमेंटची तारीख दिली जाते.

दररोज 80 अर्जांची केली जाते पडताळणी

कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयाच्या आवारात असणाऱया पासपोर्ट सेवा केंदामध्ये दररोज 80 अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते. सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस कार्यालय सुरू असते. नागरिकांनी अर्ज करतानाच कागदपत्रांच्या पडताळणीची तारीख निश्चित करावी लागते. ज्या दिवशी अपॉईंटमेंट दिली जाते त्या दिवशी दिलेल्या वेळेत अर्जदाराने उपस्थित राहणे आवश्यक असते.

पोलीस व्हेरीफिकेशन महत्त्वाचे

पासपोर्टसाठी अर्ज करताना सर्वात महत्त्वाचे असते पोलीस व्हेरिफिकेशन (पडताळणी), पासपोर्ट काढणाऱया व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचे गुन्हे असतील तर पासपोर्ट मिळण्यासाठी अडचणी निर्माण होतात. गुन्हा करून परदेशात तर जात नाही ना? याची चौकशी पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये करण्यात येते. पासपोर्ट काढणारी व्यक्ती ज्या परिसरात राहते त्या परिसरातील पोलीस स्थानकामध्ये ही पडताळणी केली जाते. संबंधित व्यक्तीला स्थानकात बोलावून आधारकार्ड, पॅनकार्ड व इतर कागदपत्रे दाखवावी लागतात. जर गुन्हा दाखल असेल तर पासपोर्ट नाकारण्याचा अधिकार पोलिसांना देण्यात आला आहे. तसेच व्हेरिफिकेशनवेळी ओळखीच्या दोन व्यक्ती घेऊन जाणे आवश्यक असते.

बेळगावसह चंदगड तालुक्मयालाही सोयीचे

कोणत्याही राज्यात पासपोर्ट काढण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे बेळगावच्या शेजारीच असणाऱया चंदगड तालुक्मयातील नागरिकांना बेळगावमध्ये पासपोर्ट काढणे सोयडचे ठरत आहे. चंदगडच्या नागरिकांना पासपोर्टसाठी 110 ते 120 कि. मी. चा प्रवास करून कोल्हापूर गाठावे लागते. त्याऐवजी 40 कि. मी. ल्t असणाऱया बेळगावमध्ये येऊन पासपोर्ट काढणे सोपे होत आहे. त्यामुळे अर्ज करताना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी बेळगाव निवडले जात आहे. मागील वर्षभरात चंदगड तालुक्मयातील अनेकांनी बेळगावमध्ये पासपोर्ट काढले आहेत.

2022 मध्ये बेळगावमध्ये पासपोर्टच्या पडताळणीसाठी आलेले अर्ज

महिनाअर्ज
जानेवारी686
फेब्रुवारी789
मार्च1113
एप्रिल1125
मे1144
जून1214

पासपोर्टसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आयडेंटीटी प्रूफसाठी – आधारकार्ड, पॅनकार्ड इ.
  • ऍडेस प्रुफसाठी – इलेक्ट्रिसिटी बिल, बँक पासबूक इ.
  • स्कुल लिव्हींग सर्टीफिकेट
  • बर्थ सर्टिफिकेट

जिल्हय़ात पासपोर्ट कार्यालय कोठे आहेत?

  • बेळगाव – कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालय
  • चिकोडी – बसव सर्कल येथील मुख्य पोस्ट कार्यालय

Related Stories

शाईफेकीचा खानापूर तालुका समितीतर्फे निषेध

Amit Kulkarni

वडगाव येथे होणार कॅन्सर हॉस्पिटल

Amit Kulkarni

गोकाक रोडशेजारील घरांमध्ये शिरले पाणी

Omkar B

‘रेडक्रॉस’तर्फे शिलाई मशीनचे वाटप

Patil_p

चिदंबरनगर येथे जुनाट वृक्षांची कत्तल

Patil_p

केएमएफच्यावतीने मदतनिधीचे वितरण

Patil_p