The new Vastu building of Sangeli Primary Health Center was inaugurated
वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत तसेच गावागावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व अन्य स्टाफ भरण्याबाबत आपण आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याशी चर्चाही केली आहे लवकरच त्यांनी सावंतवाडी तालुक्यात व मतदार संघात दौरा करण्याचे आश्वासन दिले आहे . गावा गावातील पंचक्रोशीत प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे ही अद्यावत व चांगल्या दर्जाची झाली आहेत . सह्याद्री पट्ट्यातील सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्र हे दर्जेदार आणि सर्वांसाठी उपयुक्त असे झाले आहे . या दशक्रोशीतील सर्व गावांना आता आरोग्यदृष्ट्या सर्व सुविधा मिळणार आहेत असे मत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले. सह्याद्री पट्ट्यातील कलंबिस्त दशक्रोशी पर्यटन दृष्ट्या विकसित करणार असून आंबोली चौकुळ गेळे या सह्याद्री पट्ट्यातील पावसाळी वाहणाऱ्या धबधब्यांचा उपयोग सह्याद्री पट्ट्यातील खालच्या भागातील गावांना या धबधब्यापासून एक वेगळ्या नद्या निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले . सह्याद्री पट्ट्यातून कोल्हापूर गोवा जोडणारा असा महत्त्वकांक्षी रस्ता ही आपण लवकरच करणार असल्याचेही त्याने सुचित केले श्री केसरकर यांनी आज सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सांगेली साटेली भेडशी या दोन्हीही प्राथमिक आरोग्य केंद्रांचे ऑनलाईन नवीन वास्तूचे उद्घाटन केले यावेळी त्यांनी स्पष्ट केले.. सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्र एक कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आले आहे. या नवीन वास्तूच्या इमारतीचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने श्री केसरकर यांनी केले. यावेळी या वास्तूच्या फलकाचे अनावरण व फीत कापून उद्घाटन या आरोग्य केंद्रासाठी जागा सांगेली येथील शंकर राऊळ यांनी दिली होती. त्यांच्या कुटुंबापैकी त्यांचे भाऊ तुकाराम राऊळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी तालुकाप्रमुख नारायण राणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर श्री महेश खलीपे आरोग्य विभागाचे उमेश पाटील श्रीपोळे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा शिरोडकर सांगली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर प्रिन्सचा महिजा सामाजिक कार्यकर्ते व देवस्थान समितीचे अध्यक्ष पंढरी राऊळ जीवन लाड कलंबिस्त सरपंच सपना सावंत, अंकुश परब ,गणू राऊळ, कृष्णा गावडे ,मंगलदास देसाई, विश्वास घाग ,शाहू पास्ते, उदय सावंत ,संजीव पालकर ,सदस्य हनुमंत पास्ते ,पांडुरंग पास्ते ,कृष्णा गावडे ,विनायक सावंत ,सुखदेव नाईक, गुणाजी राऊळ ,चंद्रकांत राऊळ, नर्स सौ सुनिता राऊळ, श्री नाईक आदी उपस्थित होते.
सावंतवाडी / प्रतिनिधी