पुणे / प्रतिनिधी :
शिक्षणाचा हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत खासगी शाळांमध्ये 25 टक्के रिक्त जागांवर मोफत प्रवेशासाठी ऑनलाईन लॉटरी सोडतीचे आज (बुधवारी) आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली.
आरटीई अंतर्गत मोफत प्रवेशासाठी दि. 1 ते 25 मार्च अंतर्गत ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले होते. राज्यभरातील 8 हजार 828 शाळांमध्ये 1 लाख 1969 जागा रिक्त आहेत. त्यासाठी सुमारे तीन लाख 64 हजार 470 अर्ज प्राप्त झाले आहेत. ऑनलाईन सोडत (लॉटरी) बुधवारी (उद्या) सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) येथे काढण्यात येणार आहे, असेही शरद गोसावी यांनी काढलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.
अधिक वाचा : राऊतांना गांभीर्याने घेण्याचे कारण नाही