Tarun Bharat

४९,९३९ पदवीधर मतदारांची ऑनलाईन नोंदणी

शिक्षक 208, विभागप्रमुख 195, संस्था प्रतिनिधी 118 जणांची ऑनलाईन नावनोंदणी, विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच विक्रमी नोंदणी

प्रतिनिधी/कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाने पदवीधर मतदार नावनोंदणी सोमवारी संपली असून 49 हजार 939 मतदारांनी नावनोंदणी केली. तसेच शिक्षक 208, महाविद्यालय 277 , विभागप्रमुख 195, महाविद्यालय प्राचार्यांची आणि 118 व्यवस्थापन प्रतिनिधींची ऑनलाईन नोंदणी झालीय. विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच ऐवढी मतदार नोंदणी झाल्याने विद्यार्थी संघटना, शिक्षण संस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे. 15 जुलैपर्यंत विद्यापीठातील निवडणुक विभागात ऑनलाईन अर्जाची प्रिंट जमा करावयाची आहे.

शिवाजी विद्यापीठातील विविध अधिकार मंडळासाठी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यासाठी पदवीधर ऑनलाईन मतदार नोंदणी प्रक्रिया सोमवारी पूर्ण झाली. ऑनलाईन मतदार नोंदणीला यंदा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गतवर्षी 17 हजार मतदार मतदानासाठी पात्र ठरले होते. यंदा 49939 पदवीधर मतदारांनी ऑनलाईन नोंदणी केली. यंदा विद्यार्थी संघटना, शिक्षक संघटना आणि संस्था चालकांनी पदवीधर नावनोंदणी प्रक्रिया युध्द पातळीवर राबवली. त्यामुळे आतापर्यंतच्या इतिहासात मतदारांच्या संख्येत तीनपटीने वाढ झाली आहे. सध्या प्राप्त अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू आहे. छाननीनंतर कच्ची मतदार यादी तर हरकती आणि दुरूस्तीनंतर पक्की मतदार यादी जाहीर केली जाईल. त्यानंतरच मतदारांचा अंतिम आकडा जाहीर होईल. मतदान केंद्रांची संख्या वाढवायची की नाही, याचा निर्णय घेतला जाईल. सध्या त्यानुसार शहाजी कॉलेज, कॉमर्स कॉलेज, सायबर कॉलेज ही मतदार केंद्र आहेत.

हे हा वाचा : Kolhapur : जिल्हा परिषदेकडून १२ संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती

Related Stories

विद्यार्थी हो…., पाठय़पुस्तक जपून ठेवा’

Patil_p

राजसदरेवर चांदीच्या पालखीतून सोन्याच्या मूर्तीचा सोहळा करण्याचा संकल्प

Patil_p

कोल्हापूर : हेर्ले येथील आठ दिवसांपूर्वी मुजवलेले खड्डे पूर्ववत

Archana Banage

अन्यथा सलून,पानपट्टी व्यावसायिकांना माणसी १० हजार अनुदान द्या

Archana Banage

एसटी कर्मचारी बेमुदत उपोषण; एकच मागणी, शासनात विलिनीकरण

Archana Banage

सांगली कोरोना : तासगाव तालुक्‍यात २ गावात २ रूग्ण

Archana Banage