Tarun Bharat

आरटीओ कार्यालयात ऑनलाईन प्रशिक्षण

धारवाडहून खास प्रशिक्षकाला पाचारण

प्रतिनिधी /बेळगाव

सध्या आरटीओचा कारभार ऑनलाईन सुरू आहे. सध्या ऑनलाईनचाच जमाना आहे. ऑनलाईनवरूनच वीज बिल, इतर खरेदी होताना दिसत आहे. सरकारनेही काही कार्यालयाचे शुल्क ऑनलाईन पद्धतीनेच आकारण्यास सुरुवात केली. आरटीओचा कारभारही आता ऑनलाईनच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे कार्यालयातील अधिकाऱयांना ऑनलाईन व्यवहार कसे करावेत, यासाठी प्रशिक्षण देण्यात आले.

धारवाडवरून एका अधिकाऱयाला या प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले होते. सध्या 100 टक्क्मयांपैकी 88.43 टक्के व्यवहार हा ऑनलाईन झाला असून आता कर भरणारे, परवाना काढणारे वाहन चालक ऑनलाईन माध्यमातूनच सर्व व्यवहार करत असल्याचे दिसून येत आहे. मात्र हा सर्व व्यवहार 100 टक्के ऑनलाईन व्हावा यासाठी हे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

वाहन आणि सारथी ऍपचा उपयोग कशा प्रकारे करावा यावर ट्रेनिंग देण्यात आले. दरम्यान सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे प्रशिक्षण देण्यात आले. बेळगावसह इतर आरटीओ शाखांमध्ये सुद्धा हे प्रशिक्षण देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. बेळगाव आरटीओ शिवानंद मगदूम, कचेरी अधिकारी शरणाप्पा हुग्गी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

केएससीए सेकंड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धा : नीना, आनंद, भटकळ संघ विजयी

Amit Kulkarni

फिटनेसचा वेंकटेश ताशिलदार ‘अविघ्न क्लासिकचा’ मानकरी

Amit Kulkarni

मनपा महसूल उपायुक्तपदी प्रशांत हनगंडी रुजू

Amit Kulkarni

न्या.नागमोहनदास आयोग लागू करा

Amit Kulkarni

नाणारचा रिफायनरी प्रकल्प आम्हांला हवाच!

Patil_p

पहिल्याच पावसात आलमट्टीची वाटचाल ओव्हरफ्लोकडे

Amit Kulkarni