स्वतःच्या नावावर केला विश्वविक्रम
सोशल मीडियावर एका व्यक्तीने अजब विश्वविक्रमाची माहिती लोकांसोबत शेअर केली आहे. या व्यक्तीने आतापर्यंत स्वतःच्या शरीरावर एकूण 864 इंसेक्ट्सचे टॅटू काढून घेतले आहेत. मायकल अमोईए याच्या नावावर हा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड नेंद झाला आहे. त्याने स्वतःचे पूर्ण शरीर टॅटूनी रंगविले आहे. परंतु त्याच्या टॅटूंमध्ये एक विशेष बाब आहे, ती म्हणजे त्याच्या शरीरावर काढण्यात आलेले सर्व टॅटू हे किटक-कोळय़ांचे आहेत.
मायकलने आतापर्यंत स्वतःच्या शरीरावर 864 किटकांचे टॅटू काढून घेतले आहेत. याचमुळे त्याने स्वतःच्या नावावर विश्वविक्रम केला आहे. परंतु या विक्रमानंतरही तो संतुष्ट नाही. मायकला आणखी टॅटू काढून स्वतःचा विश्वविक्रम मोडीत काढायचा आहे.
अत्यंत कमी वयातच मायकलला ल्यूकेमिया झाला होता. त्यानंतर काही काळापासून आपण किटक खातोय अशी स्वप्ने त्याला पडू लागली होती. प्रत्येकवेळी त्याला किटक खाण्याचीच स्वप्ने पडत होती. परंतु मायकलने या भीतीवर विजय मिळविण्याची तयारी सुरू केली. यासाठी त्याने शरीरावर टॅटू काढून घेण्याचा निर्णय घेतला. एका मागोमाग एक त्याने केवळ किटकांचे टॅटू काढून घेण्यास सुरुवात केली. याच नादात मायकलने स्वतःच्या शरीरावर एकूण 864 किटकांचे टॅटू काढून घेतले आहेत.
अजून झाले नाही समाधान
मायकलने या सर्व टॅर्टंचा मागील विश्वविक्रम मोडीत काढला आहे. यापूर्वी हा विक्रम ज्याच्या नावावर होता, त्याने स्वतःच्या शरीरावर 462 टॅटू काढून घेतले होते. परंतु आता हा विक्रम मायकलच्या नावावर आहे. मी अद्याप थांबणार नाही, आणखी टॅटू काढून घेत आगामी अनेक दशकांपर्यंत हा विक्रम कुणीच मोडू शकणार नाही याची व्यवस्था करणार आहे. माझे शरीर एक कॅनव्हास असून त्यावर आर्ट करत असल्याचे मायकलने म्हटले आहे.