Tarun Bharat

केवळ रक्षाबंधनाला मंदिरात मिळते दर्शन

Advertisements

वर्षातील 364 दिवस बंद राहते मंदिर

भारताला धार्मिक दृष्टीकोनाचे सर्वात मोठे केंद्र मानले जाते. हा देश लाखो-कोटय़वधी मंदिरांनी व्यापलेला आहे. येथे अनेक मंदिरांचे स्वतःचे एक वेगळे रहस्य आणि कहाणी आहे. उत्तराखंडमधील एका मंदिरात केवळ रक्षाबंधनाच्या दिवशीच दर्शन घेता येते.

या मंदिराचे नाव बंशीनारायण /वंशीनारायण असून ते उत्तराखंडच्या चमोली जिल्हय़ातील उर्गम खोऱयात आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी अनेक लोक ट्रेकिंगची मदत घेतात. उर्गम खोऱयाला बुग्याल देखील म्हटले जाते आणि हे खोरे घनदाट जंगलांनी वेढलेले आहे.

या मंदिरात केवळ रक्षाबंधनाच्या दिवशीच दर्शन घेता येते. प्रथा-परंपरांनुसार येथील महिला आणि मुली भावला राखी बांधण्यापूर्वी देवाची पूजा करतात. येथे भगवान श्रीकृष्ण आणि शिव यांची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. वामन अवतारातून मुक्त झाल्यावर भगवान विष्णू येथेच प्रकट झाले होते, तेव्हापासून नारदमुनी भगवान नारायणची पूजा येथे करत असल्याची मंदिराशी निगडित एक प्राचीन कहाणी आहे. याचमुळे येथे लोकांना केवळ एकच दिवस पूजा करण्याचा अधिकार मिळाला आहे.

मंदिरानजीक एक भालू गुहा असून तेथे भक्तांसाठी प्रसाद तयार केला जातो. रक्षाबंधनाच्या दिवशी गावातील प्रत्येक घरातून येथे लोणी येते आणि प्रसादात हे लोणी मिसळून त्याचा नैवैद्य देवाला अर्पण करण्यात येतो. मंदिरात भगवान नारायण आणि महादेव तसेच गणेश आणि वनदेवीची मूर्ती आहे.

कसे पोहोचाल...

-प्रथम उत्तराखंडच्या जोशीमठापर्यंत जावे लागेल, जे देहरादूनपासून सुमारे 293 किलोमीटर अंतरावर आहे.

-जोशीमठापासून हेलंग आणि तेथून 15 किलोमीटर अंतरावरील देवग्रामच्या दिशेने प्रवास करावा.

-बंसीनारायण मंदिराचा ट्रेक देवग्रामपासून सुरू होते आणि सुमारे 12-15 किमी लांबीचा मार्ग आहे.

Related Stories

पंजाबमध्ये 289 नवे कोरोनाबाधित

Rohan_P

TokyoOlympics: भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा, अंकिता रैना पराभूत

Abhijeet Shinde

कोरोना : जम्मू काश्मीरमध्ये 133 नवे रुग्ण; 419 जणांना डिस्चार्ज

Rohan_P

मुली गमावलेल्या तारखेलाच जुळय़ा मुलांची प्राप्ती

Patil_p

हरियाणात कोरोनाबाधितांची संख्या 9, 218 वर 

Rohan_P

सेंट्रल व्हिस्टाचे निर्मितीकार्य सुरूच राहणार

Patil_p
error: Content is protected !!