इंधनाच्या किमती व चलनवाढ नियंत्रणासाठी निर्णय
न्यूयॉर्क
पेट्रोलियम निर्यात देशांची संघटना ओपेक आणि अन्य तेल उत्पादक देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलच्या वाढलेल्या किमतीमध्ये नरमाई आणणे व जागतिक अर्थव्यवस्था प्रभाव करत असणारी चलनवाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.
ऑगस्टमध्ये कच्च्या तेलाच्या उत्पादनांमध्ये प्रतिदिन 6,48,000 बॅरेलची वृद्धी करण्यात येणार आहे. साधारणपणे कोरोना महामारीतून जगाची स्थिती सुधारत असून यामध्ये आणखीन नवे बदल करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती आहे. या अगोदर प्रत्येक महिन्याला प्रतिदिन 4,32,000 बॅरेलची जोडणी केली जात होती.
रशियाही ओपीईसीचा सदस्य आहे, उत्पादनामध्ये वृद्धीच्या निर्णयावर सौदी अरबसह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनीही यावर भर दिला असल्याची माहिती आहे. जगभरातील विविध क्षेत्रातील घटक मोठय़ा प्रमाणात प्रभावीत असल्याची स्थिती पाहता यामध्ये आता ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याचे संकेत या निर्णयामुळे निर्माण होत आहेत.
एकंदर काय तर येणाऱया काळात कच्च्या तेलाचे उत्पादन पूर्णपणे वाढविले जाणार आहे. यावर सर्वसामान्यांसह अन्य क्षेत्राचे आर्थिक बजेट काहीसे सावरण्यास मदत होणार असल्याचे तर्क आर्थिक क्षेत्रातील अभ्यासक मांडताना दिसत आहेत.
पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीत वाढ
ओपेक संघटनेच्या पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात 2021 मध्ये 77 टक्के वाढली असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. ही निर्यात किंमतीत पाहता 561 अब्ज डॉलर्सची झाली असून 2020 मध्ये 317 अब्ज डॉलर्सची पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात झाली होती. याआधी 2019 मध्ये कोरोनापूर्व काळात 562 अब्ज डॉलर्सची निर्यात तर 2018 मध्ये 687 अब्ज डॉलर्सची निर्यात करण्यात आली होती.