बेळगाव : बेळगाव शहर कपडय़ांच्या बाजारपेठेचे महत्त्वाचे केंद्र आहे. बेळगावमध्ये अनेक कापड व्यावसायिकांनी जम बसवून बेळगावला महत्त्व प्राप्त करून दिले आहे. यातील एक महत्त्वाच नाव म्हणजे ‘सुनील टेक्स्टाईल’.
शनिवारी नार्वेकर गगल्ली येथे ‘सुनील टेक्स्टाईल’च्या नव्या भव्य दालनाचा शुभारंभ होत आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार मंगल अंगडी, आमदार अनिल बेनके. माजी आमदार संजय पाटील व उद्योजक संजय घोडावत उपस्थित राहणार आहेत.
या व्यवसायाची मुहूर्तमेढ 1985 ला रोवली गेली. तत्पूर्वी सुनील कटारिया इलकलला होते. भाऊ शांतीलाल जैन टेक्स्टाईल फर्ममध्ये भागीदार होते. भाऊ बेळगावला आल्यावर सुनीलही इलकलहून बेळगावला आले. या दोघांनी मिळून 1980 मध्ये एम. एस. टेक्स्टाईल हा व्यवसाय सुरू केला. एका छोटेखानी जागेमध्ये मुहूर्तमेढ रोवलेल्या ‘सुनील टेक्स्टाईल’ने आज 25 हजार स्क्वेअरफूट जागेमध्ये आणि चार दालनांमध्ये आपला व्यवसाय स्थलांतर केला आहे. हा प्रवास निश्चितच कौतुकास्पद आहे. याचं सर्व श्रेय जाते सुनील कटारिया व त्यांचे बंधू शांतीलाल कटारिया यांना.
आज खडेबाजारमध्ये ‘सुनील टेक्स्टाईल’ची सुरुवात झाली. त्यानंतर समसुखा कॉप्लेक्स येथे त्याचे स्थलांतर झाले. व्यवसायाची इतकी वृद्धी झाली की जागा अपुरी पडू लागली. त्यामुळे पुन्हा नव्या भव्य दालनामध्ये सुनील टेक्स्टाईल्स स्थलांतर होत आहे.