प्रतिनिधी /बेळगाव
सुझुकी मोटारसायकल इंडिया प्रा. लि. आणि माणिकबाग सुझुकी यांच्या सहयोगाने 1 जून 2022 रोजी सुझुकी व्ही. स्ट्रॉमचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका नेत्रावती भागवत, प्रायव्हेट वर्कशॉप ओनर्सचे अध्यक्ष विजय कुमार, सुझुकी मोटारसायकल इंडिया प्रा. लि.चे एरिया सेल्स मॅनेजर सुधीर देशपांडे, माणिकबाग ग्रुपचे संचालक शील मिर्जी, भूषण मिर्जी, स्वप्नील शहा, मार्केटिग जनरल मॅनेजर शैलेश खटावकर उपस्थित होते. रुपेश वेर्णेकर आणि सुप्रित कुमार यांना 2 सुझुकी व्ही-स्ट्रॉम देण्यात आले.