Tarun Bharat

सायबर गुन्हेगारांच्या विरोधात ऑपरेशन चक्र

Advertisements

सीबीआयकडून 105 ठिकाणी छापे ः बनावट कॉल सेंटर्सवर कारवाई

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

देशातील वाढत्या सायबर गुन्हय़ांना रोखण्याच्या उद्देशाने सीबीआयने ऑपरेशन चक्र अंतर्गत देशभरात 105 ठिकाणी छापे टाकले आहेत. दिल्लीतील 5 ठिकाणांसह अंदमान, पंजाब, चंदीगड आणि राजस्थानातही राज्य पोलिसांच्या मदतीने छापे टाकण्यात आले आहेत.

या कारवाईदरम्यान राजस्थानच्या राजसमंदमध्ये एका बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश झाला असून छाप्यामध्ये दीड किलो सोने आणि दीड कोटी रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. सायबर गुन्हेगारांप्रकरणी इंटरपोल आणि एफबीआयकडून माहिती मिळाल्यावर सीबीआयने ही धडक कारवाई केली आहे.

देशभरातील 105 ठिकाणांपैकी 87 ठिकाणी सीबीआय क्राइम डिव्हिजन तर 18 ठिकाणी राज्य पोलिसांनी कारवाई केली आहे. अंदमानमध्ये 4 ठिकाणी, दिल्लीत 5, चंदीगडमध्ये 3 ठिकाणांसह पंजाब, कर्नाटक आणि आसाममधील प्रत्येकी 2 ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे.

सीबीआयने सायबर फ्रॉडचे अनेक गुन्हे नोंदवून तपास सुरू केला आहे. सायबर फ्रॉडचे अनेक ठोस पुरावे मिळाले असून यात डार्कनेटद्वारे फसवणुकीचे व्यवहार केले जात होते असे आढळून आले आहे. याचबरोबर सीबीआयने 2 अन्य बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. यातील एक पुण्यात तर दुसरे अहमदाबादमध्ये चालविले जात होते. ही दोन्ही कॉल सेंटर्स अमेरिकेतील ग्राहकांची फसवणूक करत होत्या.

Related Stories

‘आप’चा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर

Patil_p

सोनिया गांधींनी बोलावली विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहणार उपस्थित

Abhijeet Shinde

इंदौर : कोरोना पॉझिटिव्ह महिलेने दिला बाळाला जन्म, नाव ठेवले ‘सॅनिटायझर’

Rohan_P

व्यंकय्या नायडूंकडून सदस्यांची ‘कान’उघाडणी

Patil_p

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या तळावर आत्मघाती हल्ला; तीन जवान शहीद, दोन अतिरेक्यांचा खात्मा

Abhijeet Shinde

शेतकरी आंदोलनावर 11 जानेवारीला सुनावणी

Omkar B
error: Content is protected !!