दमदार बॅटरी, कॅमेऱयाची साथ, दोन रंगात उपलब्ध
नवी दिल्ली
5000 एमएएचची दमदार बॅटरी व 50 मेगापिक्सलच्या दमदार कॅमेऱयासह ओप्पो कंपनीने ओप्पो ए-77 हा 4 जी स्मार्टफोन काही दिवसांपूर्वीच लाँच केला आहे. मिडिया टेक हेलो जी 35 चिपसेट यामध्ये असणार आहे. यामध्ये ग्लो डिझाईनचा फोन हा दुहेरी रंगाच्या पर्यायासह सादर करण्यात आला आहे. 5000 एमएएचची दमदार बॅटरी या फोनला असणार असून 50 मेगापिक्सलचा कॅमेरा तसेच 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे. 33 डब्ल्यू सुपर व्हिओओसी चार्जिंगची सुविधा यात असणार असून 6.56 इंचाचा एलसीडी एचडी डिस्प्ले स्क्रीन असणार आहे. 4 जी रॅम व 64 जीबी स्टोअरेची व्यवस्था यात आहे. सनसेट ऑरेंज व स्कायब्ल्यू या रंगामध्ये हा स्मार्टफोन खरेदी करता येईल. यात साईड माऊंटेड फिंगरप्रिंट स्कॅनरही असेल. या स्मार्टफोनची किंमत 15,499 रुपये इतकी आहे.