वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ओप्पो कंपनीचा रेनो 8 टी हा 5जी स्मार्टफोन भारतामध्ये लाँच करण्यात आला असून त्याची किंमत 30 हजार रुपयांच्या आत असणार आहे. उत्तम डिझाईनसह सादर करण्यात आलेल्या या स्मार्टफोनला 67 वॅटचा फास्ट चार्जर असणार आहे. हा फोन रिअलमी 10 प्रो प्लस आणि रेडमी नोट 12 प्रो प्लस या स्मार्टफोन्सला आगामी काळात टक्कर देणार आहे.
उत्तम डिझाईनसह सादर झालेला हा फोन वजनामध्ये 171 ग्रॅम आणि त्याची जाडी 7.7 मिमी इतकी आहे. 6.7 इंचाचा कर्व्हड् ओएलइडी डिस्प्ले या फोनला असणार असून क्वॉलकॉम स्नॅपड्रगन 795 प्रोसेसर यामध्ये असेल. 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजसह हा फोन येणार असून अँड्रॉइड 13 वर आधारित कलर ओएस 13 चे स्वॉफ्टवेअर याला असेल. स्टोरेजमध्ये वाढ करण्याचा पर्यायही कंपनीने दिला आहे. 108 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा या फोनमध्ये असणार असून 32 मेगापिक्सलचा प्रंट कॅमेरादेखील असेल. 4800 एमएएच क्षमतेची बॅटरी सोबत दिली जाणार आहे. फोनच्यामध्ये होलपंच कटआऊट देण्यात आले आहे.