आणखी सहा उमेदवार जाहीर
शिमला / वृत्तसंस्था
भारतीय जनता पक्षाने गुरुवारी दुपारी हिमाचल प्रदेश विधानसभेच्या 6 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले. यापूर्वी भाजपने बुधवारी सकाळी 62 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. हिमाचल प्रदेशमध्ये 12 नोव्हेंबर रोजी होणाऱया विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत 19 नवीन चेहऱयांचा समावेश करण्यात आला आहे.
भाजपने माजी मंत्री रवींद्र रवी यांना ज्वालामुखी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. मात्र, ते देहरा मतदारसंघातून लढण्याच्या तयारीत होते. तसेच ज्वालामुखीचे विद्यमान आमदार रमेश ढवला यांना देहरामधून उमेदवारी देण्यात आली आहे. या दोघांच्या विधानसभा मतदारसंघांची अदलाबदल पक्षाच्या आदेशानुसार करण्यात आली असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुरेश कश्यप यांनी सांगितले.
पक्षाच्या पहिल्या यादीत जाहीर करण्यात आलेल्या 62 उमेदवारांपैकी 19 नवीन चेहरे आहेत. ते पहिल्यांदाच आमदार पदासाठी आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत. या उमेदवारांमध्ये पाच डॉक्टर आणि एक निवृत्त प्रशासकीय अधिकारी (आयएएस) आहेत. शिमला येथील आयजीएमसी रुग्णालयाचे वरि÷ वैद्यकीय अधीक्षक डॉ. जनक राज यांना भरमौर मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. अ?Ÿलोपॅथिक डॉक्टर राजेश कश्यप आणि अनिल धीमान यांना सोलन आणि भोरंजमधून उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाने निवृत्त आयएएस अधिकारी जेआर कटवाल यांना झंडुटामधून उमेदवारी दिली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत पाच महिलांची नावे आहेत.